LIVE UPDATES

महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार १ लाख रिक्षा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Maharashtra 1 Lakh Rickshaw Scheme : पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर म्हाडाच्या घरांप्रमाणे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. प्रत्येक तालुक्यात सरासरी ६० लाभार्थ्यांना रिक्षा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 26, 2026 05:06 PM
views 68  views
Maharashtra Transport Minister Pratap Sarnaik announces proposed autorickshaw scheme for small and marginal farmers

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १ लाख रिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

या योजनेत राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा समावेश असेल. पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर म्हाडाच्या घरांप्रमाणे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. प्रत्येक तालुक्यात सरासरी ६० लाभार्थ्यांना रिक्षा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप केले जाणार आहे. 

लाभार्थी शेतकऱ्यांना रिक्षा खरेदीसाठी ९० टक्के कर्ज आणि १० टक्के अनुदान देऊन या रिक्षाधारकांना आरटीओची फी देखील माफ करण्याचाही समावेश या प्रस्तावात आहे. या योजनेचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.



ताजी बातमी

View all

Residents of Govalkot, Pethmap and Uktad staging a chain hunger strike outside Chiplun Municipal Council demanding clean drinking water.
Chiplun Water Crisis : स्वच्छ पाण्यासाठी चिपळूणकर आक्रमक
November 26, 2026
Vaibhavwadi Child Abuse Case : वैभववाडी तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करावी
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
सावंतवाडी पंचायत समितीत संविधान दिन उत्साहात
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
देवगडात ‘असिस्टंट ज्यूट क्राफ्ट प्रॉडक्ट्स मेकर’ प्रशिक्षण वर्ग
November 26, 2026
संबंधित बातम्या

View all

NCP leader Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital in Mumbai due to suspected dehydration
Sharad Pawar : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
November 26, 2026
Traditional Deepdan and illuminated temple lamps during Tripuri Purnima celebrations at a Sateri Devi temple in Konkan.
Tripuri Purnima Significance : त्रिपुरारीच्या रात्री सातेरीचा जागर का ?
November 23, 2026
Dr Raghunath Mashelkar addressing the Naik Maratha Mandal centenary celebration in Mumbai.
‘E = F’ हे समीकरण न्यूटन आणि आइन्स्टाईन यांच्या समीकरणांपेक्षाही मोठे
November 23, 2026
‘पंचायत धरोहर’ उपक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्य नोडल अधिकारी म्हणून शिवराज राठोड यांची नियुक्ती
November 23, 2026