LIVE UPDATES

Maharashtra Board Exam Time Table 2027 : दहावी-बारावी बोर्डाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, पाहा वेळापत्रक

बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारी पासून : दहावीची १५ फेब्रुवारीपासून सुरू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 07, 2026 03:59 PM
views 495  views

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, इयत्ता १२ वीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२७ पर्यंत चालेल. तर इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १५ मार्च २०२७ रोजी संपेल.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या जातील. परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयांच्या परीक्षांच्या तारखा आणि सत्रे आधीच तपासून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

इयत्ता १० वीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून

महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होतील आणि १५ मार्च २०२७ पर्यंत चालतील. विद्यार्थी एसएससी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

इयत्ता 12 वीच्या परीक्षा 8 फेब्रुवारीपासून

महाराष्ट्र बोर्डाच्या एचएससी परीक्षा 8 फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होतील आणि १८ मार्च २०२७ पर्यंत चालतील. विद्यार्थी एचएससी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

असे डाउनलोड करा इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे वेळापत्रक

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट द्या. मुख्य पृष्ठावर २०२७ च्या एसएससी किंवा एचएससी परीक्षेच्या वेळापत्रकाशी संबंधित लिंकवर क्लिक करा. तुमच्या इयत्तेनुसार (१० वी किंवा १२ वी) वेळापत्रक निवडा. विषयनिहाय परीक्षेचे वेळापत्रक स्क्रीनवर दिसेल. हे वेळापत्रक डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.