LIVE UPDATES

CBSE Board Exam Time Table 2027 : 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 07, 2026 01:01 PM
views 223  views
CBSE Board Exam 2027 timetable announced for Class 10 and Class 12 examinations.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने  इयत्ता 10वी आणि 12वीच्या आगामी वार्षिक परीक्षांसाठीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 10वी आणि 12वी अशा दोन्ही वर्गांच्या मुख्य प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 पासून एकाच वेळी सुरू होणार आहेत. परीक्षांचे नियोजन अचूक व्हावे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने मंडळाने परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल 101 दिवस आधीच हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

त्यानंतर मुख्य लेखी परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:

इयत्ता 10वी परीक्षा : 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027

इयत्ता 12वी परीक्षा : 16 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2027

परीक्षेची वेळ : सर्व विषयांचे पेपर्स एकाच सत्रात सकाळी 10:30 ते दुपारी 01:30 या वेळेत पार पडतील.

व्होकेशनल आणि कौशल्य-आधारित विषयांच्या परीक्षा वेगवेगळ्या दिवशी आयोजित केल्या गेल्या आहेत. 'ऑटोमोटिव्ह' आणि 'डेटा सायन्स' सारख्या विषयांच्या परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होतील. २५ फेब्रुवारी रोजी 'रिटेल' आणि 'हेल्थकेअर'सह विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. 

प्रादेशिक भाषांच्या परीक्षा २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत नियोजित आहेत. फ्रेंच भाषेची परीक्षा ६ मार्च रोजी होईल. शेवटच्या दिवशी, म्हणजेच ९ मार्च रोजी, जर्मन आणि स्पॅनिशसह अनेक परदेशी भाषांच्या परीक्षा होतील. अधिकृत पीडीएफ मध्ये तुमच्या संबंधित विषयांचा विषय कोड आणि तारीख नक्की तपासा. जर एकाच दिवशी अनेक विषयांच्या परीक्षा असतील, तर प्रत्येक परीक्षेची वेळही तपासून घ्या.

सर्वप्रथम cbse.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर, 'लेटेस्ट नोटिफिकेशन' विभागात जा. तिथे तुम्हाला २०२७ च्या इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकाबाबतची सूचना मिळेल. ती उघडून पीडीएफ पहा आणि तुमच्या इयत्तेचे वेळापत्रक तपासा. हे डॉक्युमेंट सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्या.


ताजी बातमी

View all

जलतरण स्पर्धेत टीम सिंधुदुर्गनगरीची पदकांची लयलूट
November 08, 2026
कलंबिस्त गावात दिवाळीचा गोडवा डबल
November 08, 2026
अंध बांधवाना टी-शर्ट - साड्या - दिवाळी फराळाचं वाटप
November 08, 2026
सावंतवाडीत ‘सुरमयी दिवाळी पहाट’चं आयोजन
November 08, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam Time Table 2027 : दहावी-बारावी बोर्डाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, पाहा वेळापत्रक
November 07, 2026
AISSEE 2027 Sainik School entrance examination notification for admission to Class 6 and Class 9 for the 2027-28 academic year.
Sainik School Admission 2027 : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
November 05, 2026
Fly91 daily flight service between Sindhudurg Chipi Airport and Navi Mumbai starting November 16, 2026.
Sindhudurg to Navi Mumbai Flight : सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू
November 05, 2026
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis announces 12 major decisions at the Maharashtra Cabinet meeting.
फडणवीस सरकारचे १२ मोठे निर्णय! वाहनधारकांना दंडात सवलत, विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ; पाहा संपूर्ण यादी
November 04, 2026