
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवेच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले असून, येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी या मार्गावरील fly91 विमानाचे उड्डाण होणार आहे. विशेष म्हणजे, आता आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'X' या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट करत ही माहिती दिली. 'येवा, कोकण आपलोच आसा!' असे म्हणत त्यांनी प्रवासी आणि पर्यटकांना या विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. कोकणवासीय, पर्यटक, व्यावसायिक तसेच मुंबई आणि नवी मुंबईशी नियमित संपर्क ठेवणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच जिल्ह्याची मुंबई महानगर प्रदेशाशी हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घडामोड ठरणार आहे.
Navi Mumbai - Sindhudurg - Navi Mumbai flights booking begins !!! 16th NOV first flight ! येवा कोंकण आपलोच आसा ! https://t.co/2fLnXMNVXp
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 5, 2026
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








