LIVE UPDATES

फडणवीस सरकारचे १२ मोठे निर्णय! वाहनधारकांना दंडात सवलत, विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ; पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Decisions 2026 : वाहनधारकांना प्रलंबित दंड भरण्यासाठी अभय योजना, विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा अशा विविध विषयांवरील एकूण १२ निर्णयांवर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 04:30 PM
views 100  views
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis announces 12 major decisions at the Maharashtra Cabinet meeting.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वाहनधारकांना प्रलंबित दंड भरण्यासाठी अभय योजना, विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा अशा विविध विषयांवरील एकूण १२ निर्णयांवर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयांचा राज्यातील विविध घटकांना मोठा फायदा होणार असून, नेमके कोणते १२ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, जाणून घेऊया...

पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ

पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यामध्ये वाढ. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयाच्या ठिकाणी सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळणार. पशुधनाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना, पशुपालकांना मदत होणार. (पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय विभाग )

वाहनधारकांसाठी अभय योजना

वाहनांवरील दंडासाठी अभय योजना. नियमभंग केलेल्या वाहनावरील दंडासाठी महाराष्ट्र वाहतुक पोलीस चलान अभय योजना-२०२६. चलनावरील प्रलंबित दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून वीस टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार. वाहन धारकांना थकबाकी भरून वाहन दंडमुक्त करता येणार. (गृह विभाग)

नागपुरात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या नागपूर येथील कृषि महाविद्यालयाच्या दाभा येथील जागेवर आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्रास मंजूरी. या केंद्राच्या ६४४ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता. (कृषि विभाग)

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ

वसतिगृहात राहणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातीं व विशेष मागास प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निर्वाह भत्त्यात दुपटीहून अधिक वाढ. विभागस्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना महिन्याला पंधराशे, तर जिल्ह्याच्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना तेराशे रुपये मिळणार. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृह योजनेंतर्गत निर्वाह भत्ता वाढीस मंजूरी. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग )

पालघर जिल्ह्यात तीन ग्राम न्यायालये

पालघर जिल्ह्यात तीन ग्राम न्यायालये स्थापन करण्यास मंजूरी. तलासरी, मोखाडा व विक्रमगड येथे ग्राम न्यायालय स्थापन होणार. या न्यायालयांसाठी प्रत्येक पाच अशा एकूण पंधरा अनुषंगिक पदांना मान्यता. त्यासाठीच्या आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मंजूरी. (विधि व न्याय विभाग)

मुखेडमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापनेस मंजूरी. यापूर्वी मंजूर जोड न्यायालयाऐवजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे नियमित न्यायालय स्थापन होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदांना, व त्याकरिताच्या खर्चाच्या तरतुदीस मंजूरी. (विधि व न्याय विभाग)

बिडगाव-तरोडी नगर पंचायतीला जमीन

नागपूर जिल्ह्यातील नगर पंचायत बिडगाव तरोडी (खुर्द) पांढुर्णा (ता. कामठी) यांना १ हेक्टर ८६ आर जमीन देण्यास मंजूरी. नगर पंचायतीला प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी जमीन देण्याचा निर्णय. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

गोंदियातील घरांसाठी दिलेल्या जमिनींचे विनामूल्य रूपांतरण

गोंदिया शहरामधील लिलावाद्वारे अथवा भाडेतत्त्वावर घरांसाठी दिलेल्या जमिनीचे रुपांतरण विनामूल्य वर्ग – १ मध्ये करण्यास मंजूरी. अनेकांना मिळणार दिलासा. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग )

सिद्धिविनायक मंदिर न्यासाला मुद्रांक शुल्क माफी

मुंबईतील सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतलेल्या राम मेन्शन इमारतीच्या खरेदीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंजूरी. मंदिर परिसर विकास, भाविकांसाठी सोयी-सुविधांसाठी महत्त्वाचा निर्णय. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग )

सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्ती होणार नाही

मुदत संपलेल्या अ प्रकारातील आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित अशा अठरा संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती केली जाणार नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये कलम ७३ अअअ (३) परंतुकातील महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नियम ४ मध्ये सुधारणा करण्यास मंजूरी. (सहकार विभाग)

मोठ्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर पाच सदस्यांची नियुक्ती

राज्यातील ज्या सहकारी संघिक संस्थांची वार्षिक उलाढाल पाचशे कोटींहून अधिक आहे, अशा संस्थांच्या समित्यांवर शासन नामनिर्देशित पाच सदस्यांची नियुक्ती होणार. एक सहाय्यक निबंधकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी आणि संस्थेच्या कार्याचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींची नियुक्ती होणार. शासकीय अधिकाऱ्याला मताचा अधिकार नसेल. 

इतर चौघांना संचालक मंडळात मताचा अधिकार, पण ते संस्थेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीस पात्र राहणार नाहीत. ही सुधारणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू राहणार नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०च्या कलम ७३ अअअ (२) च्या परंतुकामध्ये नवीन परंतुक समाविष्ट करण्यास मंजूरी. (सहकार विभाग)

हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठाच्या नियमांत बदल

हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट युनिव्ह्रर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठातील कुलाधिकारी पदाचा कार्यकाळ व वयोमर्यादेची अट वगळण्याकरीता तसेच कुलगुरु पदावरील व्यक्ती पुनर्नियुक्तीस पात्र ठरविण्याकरीता अधिसूचनेत सुधारणा करण्यास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण)


ताजी बातमी

View all

Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
US Midterm Election Results 2026 showing Democratic Party victories in the Senate and House, with Donald Trump and Indian-American candidates in the spotlight.
US Midterm Election Results 2026 : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का, डेमोक्रॅट्सला मिळाले बहुमत
November 04, 2026
Mumbai Suburban men's and women's teams celebrate their victories at the Mumbai University Inter-Zonal Kabaddi Championship in Ratnagiri.
मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी
November 04, 2026
सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

Chipi Airport Sindhudurg to Navi Mumbai daily flight service announcement.
Sindhudurg to Navi Mumbai Flight Service : सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस
November 03, 2026
ईपीएस पेन्शनवाढीसाठी पेन्शनर्स आक्रमक
November 03, 2026
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis announces the Maharashtra Public Relief Society initiative for needy patients and disaster victims.
Maharashtra Public Relief Society : मुख्यमंत्री फडणवीसांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना
November 03, 2026
Devgad Alphonso Hapus mango box sold for ₹36,000 at Mumbai's Vashi Market before the regular mango season.
Devgad Hapus Mango Price : हंगामाआधीच देवगड हापूसचा ‘षटकार’
October 30, 2026