LIVE UPDATES

Sainik School Admission 2027 : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

३१ जानेवारीला परीक्षा ; २ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 05:47 PM
views 67  views
AISSEE 2027 Sainik School entrance examination notification for admission to Class 6 and Class 9 for the 2027-28 academic year.

सावंतवाडी : संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या वतीने देशभरातील सैनिक स्कूल्समधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा - २०२७ चे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी आणि नववीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. सहावीच्या प्रवेशासाठी सध्या पाचवीत शिकणारे, तर नववीच्या प्रवेशासाठी सध्या आठवीत शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. ही प्रवेश परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी देशभरात घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांचे असून पेन-पेपर पद्धतीने ओएमआर उत्तरपत्रिकेवर परीक्षा होईल.

सहावीसाठी परीक्षेचा कालावधी १५० मिनिटे असून ही परीक्षा १३ भाषांमध्ये उपलब्ध असेल. तर नववीसाठी परीक्षेचा कालावधी १८० मिनिटे असून ती इंग्रजी माध्यमातून घेतली जाणार आहे. परीक्षेच्या शहराची माहिती ११ जानेवारी रोजी जाहीर होणार असून प्रवेशपत्र २५ जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.

सैनिक शाळांमधील शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव विकसित करण्याची संधी मिळते. संरक्षण दलांमध्ये अधिकारी म्हणून करिअर करण्याची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक शाळांचे शैक्षणिक वातावरण विशेष उपयुक्त ठरते.

प्रवेश परीक्षेसाठी अर्ज, माहितीपत्रक आणि अन्य तपशील राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये या परीक्षेसंबंधी विशेष मार्गदर्शन कक्ष उपलब्ध असून पालक आपल्या पाल्याची पात्रता, प्रवेशाचे निकष आणि अभ्यासक्रम यासंबंधी माहिती इथे घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी 9167077940 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Parents protest over the teacher shortage at Kamalevir School in Sawantwadi, demanding a graduate teacher for nearly 100 students.
कामळेवीर शाळेतील शिक्षक नियुक्तीचे आश्वासन हवेतच
November 05, 2026
सावंतवाडी नगरपरिषदेचा यशस्वी उपक्रम
November 05, 2026
Sawantwadi Taluka Kabaddi Association announces boys and girls kabaddi selection trials for the Sindhudurg District Championship 2026.
Sawantwadi Kabaddi Selection : सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
November 05, 2026
Sawantwadi Indira Gandhi Commercial Complex where 138 shopkeepers have outstanding premium payments and most have pending monthly rent.
Sawantwadi News :व्यापारी संकुलातील तब्बल 138 गाळेधारकांकडे प्रीमियम थकीत
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

Fly91 daily flight service between Sindhudurg Chipi Airport and Navi Mumbai starting November 16, 2026.
Sindhudurg to Navi Mumbai Flight : सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू
November 05, 2026
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis announces 12 major decisions at the Maharashtra Cabinet meeting.
फडणवीस सरकारचे १२ मोठे निर्णय! वाहनधारकांना दंडात सवलत, विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ; पाहा संपूर्ण यादी
November 04, 2026
Chipi Airport Sindhudurg to Navi Mumbai daily flight service announcement.
Sindhudurg to Navi Mumbai Flight Service : सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस
November 03, 2026
ईपीएस पेन्शनवाढीसाठी पेन्शनर्स आक्रमक
November 03, 2026