LIVE UPDATES

कलंबिस्त गावात दिवाळीचा गोडवा डबल

मोबाईल रेंजचा प्रश्न कायमचा मार्गी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 08, 2026 07:16 PM
views 50  views

सावंतवाडी : कलंबिस्त गावात गेल्या कित्येक वर्षाच्या मागणीला अखेर यश आले आहे. मोबाईल टॉवरची प्रतीक्षा सर्वांना लागून होती. मोबाईलची रेंज मिळत नसल्यामुळे या भागात तीव्र नाराजी होती. पण, अखेर आयडिया कंपनीच्या टॉवरचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कित्येक वर्षाची प्रतीक्षा आज फळाला आली, अशा शब्दात उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

गेल्या कित्येक वर्षापासून या भागात मोबाईल टॉवरची मागणी ग्रामस्थांची होती. पण, यश काही मिळत नव्हते. पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांनी आपली स्वतःची जागा उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांना रेंज उपलब्ध व्हावी आणि त्यांची ऑनलाईन कामे सुरळीत व्हावी या दृष्टीने त्यांनी दातृत्व दाखवले. त्यातून आयडिया कंपनीचा मोबाईल टॉवर उभारला गेला.

दिवाळी सणाच्या शुभमुहूर्ताला या टॉवरचे उद्घाटन शानदार पद्धतीने करण्यात आले. पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते,ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे नेते संदेश बिडये, किरण सावंत, ग्रामस्थ सगुण पास्ते, निलेश सावंत, महेश सावंत, प्रवीण सावंत, विक्रांत तावडे, सचिन सावंत, नामदेव पास्ते, प्रणेश म्हाडगूत, बाळा राजगे, रामचंद्र सावंत, बाबू सावंत, रूपा सावंत, कॅप्टन अरुण सावंत, अनिल सावंत, भरत म्हाडगूत बाबू बिडये आदी उपस्थित होते.