LIVE UPDATES

महाराष्ट्रात कोकणी अकादमी स्थापन करण्याची मागणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देवेंद्र फडणवीसांना लिहिणार पत्र

Konkani Academy in Maharashtra : पुणे येथे अखिल भारतीय कोकणी परिषद आणि औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४ व्या अखिल भारतीय कोकणी अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 14, 2026 06:14 PM
views 104  views
Goa Chief Minister Pramod Sawant speaking at the 34th All India Konkani Convention in Pune.

पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात रमलेल्या नव्या पिढीने, विशेषतः 'जेन झी'ने कोकणी भाषा आणि साहित्यापासून दूर जाऊ नये. तरुणांनी कोकणी साहित्याचे वाचन करावे, स्वतः लेखन करावे आणि आपल्या भाषेच्या समृद्ध परंपरेत योगदान द्यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पुणे येथे अखिल भारतीय कोकणी परिषद आणि औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४ व्या अखिल भारतीय कोकणी अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी गोवा मुक्ती लढ्यात पुणे आणि मुंबईतील व्यक्तींचे योगदान अविस्मरणीय असल्याचे नमूद केले.

दरम्यान, महाराष्ट्रात कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी स्वतंत्र कोकणी अकादमी स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सावंत यांनी मांडला. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अकादमी स्थापन करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या कोकणी भाषिकांना साहित्यनिर्मिती, भाषेचा अभ्यास आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या मागणीमागील उद्देश आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात कोकणी साहित्यिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 

साहित्यिकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनजागृती करत स्वातंत्र्यचळवळीला बळ दिले. त्याचप्रमाणे गोव्याच्या मुक्तिसंग्रामात पुणे आणि मुंबईतील नागरिकांनी दिलेले योगदानही विसरता येणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आवर्जून सांगितले. 

कोकणी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून गोव्याची सांस्कृतिक ओळख आणि साहित्यिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन, लेखन आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये नव्या पिढीने पुढाकार घ्यावा, असा संदेश मुख्यमंत्री सावंत यांनी दिला.


ताजी बातमी

View all

Kokansad Diwali magazine 2026 praised by renowned Marathi literary figure Gurudas Pandurkar for its cultural and literary value.
Kokansad Diwali Ank 2026 : साहित्यिक फराळाबरोबरच जिवंत सांस्कृतिक दस्ताऐवज
November 14, 2026
दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026
वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
November 14, 2026
दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला
November 14, 2026
संबंधित बातम्या

View all

मुख्याध्यापक संघाच्या ६५ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला दोन्ही आमदारांकडून चार लाखांची देणगी
November 14, 2026
Maharashtra Minister Uday Samant speaks about Deputy Chief Minister Eknath Shinde's leadership.
Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास : डॉ. उदय सामंत
November 13, 2026
Training aircraft skids off the runway at Solapur Airport during takeoff, woman trainee pilot safe
Solapur Airport Incident : सोलापूर विमानतळावर विमानाचा थरारक अपघात; उड्डाणादरम्यान प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर
November 12, 2026
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचा विजय; राजेश पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी
November 10, 2026