
कोल्हापूर : राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची अखेर निवडणूक संपन्न झाली असून माजी आमदार राजेश पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. मात्र, राजेश पाटील यांचे अध्यक्षपद केवळ वर्षभरासाठी असणार असल्याचेही आजच निश्चित झाले आहे. त्यामुळे, गोकुळच्या अध्यक्ष निवडप्रक्रियेत ऐनवेळी ट्विस्ट पाहायला मिळाला.
महायुतीमध्ये अध्यक्षपद पहिल्यावर्षी राष्ट्रवादीकडे ठरल्याने श्री. पाटील हे वर्षभरासाठी अध्यक्ष असतील. त्यानंतर आम्ही बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे खासदार धनंजय महाडीक यांनी स्पष्ट केले.
'गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 13 विरुद्ध 16 असा महायुतीचा विजय झाला. म्हणजेच शासननियुक्त चारही संचालकांनी महायुतीच्या पारड्यात मतं टाकल्याचं स्पष्ट झालं. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यामध्ये गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर, तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यात लढत झाली.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या या लढतीत राजेश पाटील यांचा विजय झाला. गोकुळच्या निवडून आलेल्या 25 संचालकांनी आणि शासननियुक्त 4 संचालकांनी या मतदानप्रक्रियेत भाग घेतला.
13 चा बहुमत झालं पण, 14 चं कोरम झालं नाही, त्यामुळे परमेश्वर कोणाच्या बाजूने झाला ? नियतीने कुणाच्या बाजूनं न्याय दिला ? असा सवाल करत परमेश्वर आणि नियती या प्रामाणिक लोकांच्या मागे राहत असते, दृष्ट कारवाया करणाऱ्या लोकांच्या मागे, कट कारस्थान करणाऱ्यांच्या मागे आणि जो मदत करेल त्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या मागे परमेश्वर कधी मागे राहत नाहीत, असे म्हणत महाडीक यांनी सतेज पाटील यांच्या गटावर टीका केली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








