LIVE UPDATES

Solapur Airport Incident : सोलापूर विमानतळावर विमानाचा थरारक अपघात; उड्डाणादरम्यान प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 04:43 PM
views 82  views
Training aircraft skids off the runway at Solapur Airport during takeoff, woman trainee pilot safe

सोलापूर : सोलापूर विमानतळावर आज प्रशिक्षणार्थी वैमानिकाद्वारे प्रशिक्षण विमान उडवण्याचा प्रयत्न करताना विमान धावपट्टीवरून घसरल्याने विमानाचा अपघात घडला. विमान घसरल्याने धावपट्टीवरून बाहेर गेले. या दुर्घटनेत वैमानिकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. विमानात नेमके किती लोक होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरुन समोर आलेल्या विमानांच्या फोटोंनुसार विमान पुढच्या दिशेला झुकलेले आणि त्याचा पुढचा भाग जमिनीला टेकलेला दिसत आहे.

'टाइम्स नाऊ'च्या वृत्तानुसार, गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी सोलापूर विमानतळावर हे विमान एक महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक चालवत होती. उड्डाण करण्याचा प्रयत्न करत असताना विमान धावपट्टीवरून घसरले. उड्डाणादरम्यान विमानावरील नियंत्रण सुटण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने, प्रशिक्षणार्थी वैमानिक सुरक्षित असून तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

सोलापूर विमानतळ प्रशासनाने या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, एका फ्लाइंग क्लबचे हे विमान दुपारी अडीचच्या सुमारास उड्डाण करण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीवरून बाहेर गेले. घटनेनंतर अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस पथकासह आपत्कालीन सेवा तत्काळ विमानतळावर पोहोचल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
MLA Rohit Pawar : वटवृक्ष स्वामी देवस्थानाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : विश्वनाथ गिरकर यांचे निधन
November 12, 2026
Naigaon railway station incident where a woman was allegedly pushed from a local train
लोकलमधील छेडछाडीला विरोध केला अन् तरुणीला ट्रेनमधून ढकलले; नायगावच्या घटनेत तरुणीने गमावला हात
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचा विजय; राजेश पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी
November 10, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Gokul President Election 2026 Court Hearing : गोकुळच्या सत्ता संघर्षावर कोर्टात जोरदार युक्तिवाद
November 09, 2026
Maharashtra Board Exam Time Table 2027 : दहावी-बारावी बोर्डाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, पाहा वेळापत्रक
November 07, 2026
CBSE Board Exam 2027 timetable announced for Class 10 and Class 12 examinations.
CBSE Board Exam Time Table 2027 : 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
November 07, 2026