LIVE UPDATES

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास : डॉ. उदय सामंत

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 06:44 PM
views 118  views
Maharashtra Minister Uday Samant speaks about Deputy Chief Minister Eknath Shinde's leadership.

रत्नागिरी : कोणी कोणासोबत जायचे हा धोरणात्मक निर्णय घेण्याचे सर्व अधिकार केवळ शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्हा सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, शिंदे साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने आणि जनतेच्या आशीर्वादाने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांना कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे ठाम प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. आज पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

एकनाथ शिंदे दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी (दरे गाव, जि. सातारा) गेले असता विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा सामंत यांनी समाचार घेतला. प्रत्येकाला आपल्या गावी जाण्याचा लोकशाही अधिकार आहे. उलट दरे गावातूनच त्यांनी कोकणाला जोडणारे तीन महत्त्वाचे बोगदे (टनेल) आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठे प्रकल्प मार्गी लावण्याचे निर्णय घेतले आहेत, असेही सामंत यांनी नमूद केले.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर बाटल्या फेकण्याच्या प्रकाराचा सामंत यांनी तीव्र निषेध केला. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जर यात कोणा अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा असेल तर मुख्यमंत्री स्वतः याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील, असे ते म्हणाले.

तसेच, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची ख्याती जगभरात असून, एखाद-दुसऱ्या चुकीमुळे संपूर्ण पोलीस दलावर आक्षेप घेणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी पोलिसांचे समर्थन केले.

छटपूजेवरून राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले की, "छटपूजा ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, तिचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकांशी संबंध जोडणे चुकीचे आहे."

"महाराष्ट्र हा सर्वांना सामावून घेणारा असला तरी मराठी माणूस आणि मातृभाषेचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. रेल्वे स्थानकांवर (सानपाडा आणि वाशी) वाजवल्या गेलेल्या भोजपुरी गाण्यांच्या संदर्भात बोलताना, राज्यात मातृभाषेचा अवमान होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकारच्या यंत्रणांनीही घ्यावी," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तरुण वर्ग (Gen-Z) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करत, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील आणि राज्यातही महायुतीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, हा संभ्रम स्वतः तटकरे साहेब आणि शरद पवार किंवा सुनेत्रा पवार हेच दूर करू शकतात, असे मत सामंत यांनी या वेळी मांडले.


ताजी बातमी

View all

उपजिल्हा रुग्णालय परिसरातील पायऱ्यांचे रूप पालटले
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg Political News : कणकवलीत रंगला १९८३ च्या शिवसैनिकांचा स्नेह मेळावा
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
बोअरवेलमधील पंप चोरीला
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
District-Level Presentation Competition : जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा संपन्न
November 13, 2026
संबंधित बातम्या

View all

Training aircraft skids off the runway at Solapur Airport during takeoff, woman trainee pilot safe
Solapur Airport Incident : सोलापूर विमानतळावर विमानाचा थरारक अपघात; उड्डाणादरम्यान प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर
November 12, 2026
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचा विजय; राजेश पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी
November 10, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Gokul President Election 2026 Court Hearing : गोकुळच्या सत्ता संघर्षावर कोर्टात जोरदार युक्तिवाद
November 09, 2026
Maharashtra Board Exam Time Table 2027 : दहावी-बारावी बोर्डाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, पाहा वेळापत्रक
November 07, 2026