LIVE UPDATES

सावंतवाडीत उद्या भव्य रोजगार मेळावा | एकाच दिवसात तब्बल 700 हून अधिक जणांना मिळणार नोकरीची संधी

'ॲडमिशन', 'व्हॅरेनियम क्लाउड' आणि 'सिक्योर क्रेडेंशियल्स' यांचे संयुक्तरित्या आयोजन
Edited by: भरत केसरकर
Published on: January 04, 2023 07:33 PM
views 529  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीला रोजगार देण्यासाठी 'ॲडमिशन', 'व्हॅरेनियम क्लाउड' आणि 'सिक्योर क्रेडेंशियल्स' या कंपन्यांनी संयुक्तरित्या उद्या गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे उद्या दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल. या रोजगार मेळाव्यात 'आजच मुलाखत; आजच निवड' या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी मिळेल. तसेच यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल. 

    या रोजगार मिळाव्यात एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सामील झाल्या आहेत.  

    या मेळाव्यात बॅक ऑफिस, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मेकॅनिक्स, डाटा ऑपरेटर, सेल्स एक्सिक्युटीव्ह, आयटी, एज्युकेशन, टेक्निशियन, हॉटेल सर्व्हिसेस या क्षेत्रात नोकरीच्या ससंधी उपलब्ध होतील. त्यामुळे सिंधुदुर्गातील अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Traditional Deepdan and illuminated temple lamps during Tripuri Purnima celebrations at a Sateri Devi temple in Konkan.
Tripuri Purnima Significance : त्रिपुरारीच्या रात्री सातेरीचा जागर का ?
November 23, 2026
Sindhudurg Zilla Parishad Standing Committee meeting discussing the release of eight teachers and proposed transfers of 28 Community Health Officers.
Sindhudurg News : सभागृहाच्या ठरावाला केराची टोपली? आठ शिक्षकांच्या कार्यमुक्तीवर स्थायी समितीत संताप
November 23, 2026
Participants performing traditional Konkan folk dances and cultural programmes at the Sindhudurg District Youth Festival 2026.
Sindhudurg District Youth Festival 2026 : जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सिंधुदुर्गच्या युवा कलागुणांचा अविष्कार
November 23, 2026
अवैध गोवा दारु विक्री प्रकरणी कणकवलीत एकावर कारवाई
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

Traditional Deepdan and illuminated temple lamps during Tripuri Purnima celebrations at a Sateri Devi temple in Konkan.
Tripuri Purnima Significance : त्रिपुरारीच्या रात्री सातेरीचा जागर का ?
November 23, 2026
Dr Raghunath Mashelkar addressing the Naik Maratha Mandal centenary celebration in Mumbai.
‘E = F’ हे समीकरण न्यूटन आणि आइन्स्टाईन यांच्या समीकरणांपेक्षाही मोठे
November 23, 2026
‘पंचायत धरोहर’ उपक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्य नोडल अधिकारी म्हणून शिवराज राठोड यांची नियुक्ती
November 23, 2026
Maharashtra Minister Nitesh Rane criticizes Shiv Sena UBT leader Sanjay Raut over remarks on Veer Savarkar.
Nitesh Rane on Sanjay Raut : "नाहीतर खाण्‍यापिण्‍याचे वांदे होतील"
November 20, 2026