LIVE UPDATES

अवैध गोवा दारु विक्री प्रकरणी कणकवलीत एकावर कारवाई

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 08:32 PM
views 15  views

कणकवली : गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या एकावर कणकवली पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत संशयिताकडून १२ हजार रुपयांची दारू जप्त केली. गोवा दारू विक्री प्रकरणी संशयित मेघेश दिलीप पाटील (वय ३७, रा. नडगिवे) याच्यावर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, संशयिताकडून १२ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई तळेरे-औंदुबरनगर येथील माळरानावर सोमवार दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास केली. एलसीबीचे राजू जामसंडेकर, किरण देसाई, ज्ञानेश्वर तवटे यांनी कारवाई केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर तवटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेघश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.