LIVE UPDATES

बिस्लेरीचं पाणी पिण्यासाठी असुरक्षित? चाचणीत नमुने फेल; कंपनीचंही स्पष्टीकरण समोर, वाचा सविस्तर

Bisleri Water Controversy : बिस्लेरीशी संबंधित या वादामुळे आगामी काळात आता देशभरातील इतर ब्रँड्सच्या बाटलीबंद पाण्याचीही तपासणी केली जाईल.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 03:24 PM
views 54  views
Bisleri packaged drinking water bottle amid FSSAI investigation over bromate levels in water samples from Goa plant.

पणजी : पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड 'बिस्लेरी'च्या पाण्याचे नमुने चाचणीत फेल झाल्याप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयीन खटला चालवण्यास परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिस्लेरीच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने गोव्यातील प्लांटमधून तपासणीसाठी घेण्यात आले होते. या तपासणीत पाण्यामध्ये ब्रोमेट या रासायनिक घटकाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. ३० सप्टेंबर २०२५ रोजी, FSSAI ने या प्रकल्पातून पाण्याचे सहा नमुने घेतले होते. यापैकी पाच नमुने आवश्यक मानकांनुसार योग्य आढळले, परंतु सहाव्या नमुन्यात प्रति लिटर १२ मायक्रोग्राम ब्रोमेट आढळले. जे १० मायक्रोग्राम प्रति लिटरच्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होते.

बिस्लेरीच्या पाण्यात केमिकल आढळल्याचा दावा समोर आल्याच्या दुसऱ्या दिवशी कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, त्यांचे पॅकेज्ड पिण्याचे पाणी सुरक्षित आहे. एका 'रेफरल लॅबोरेटरी'मध्ये करण्यात आलेल्या चाचणीत ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेच्या आत असल्याचे दिसून आले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बिस्लेरीशी संबंधित या वादामुळे आता देशभरातील पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. याचा अर्थ असा की, आगामी काळात इतर ब्रँड्सच्या बाटलीबंद पाण्याचीही तपासणी केली जाईल.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : कास ग्रामविकास संस्थेचा दुसरा स्नेहमेळावा उत्साहात
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Omkar Elephant Sindhudurg : ओंकारच्या मनोमिलनाची चाहूल !
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal Malvan News : कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासासाठी आमदार निलेश राणेंचा लेखाजोखा
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi Sub District Hospital : डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन सावंतवाडीत दाखल
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

Supreme Court of India seeks Centre's response on restrictions on marriages between close blood relatives.
रक्ताच्या नात्यातील विवाहांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला महत्त्वाची सूचना
November 23, 2026
Lutru Mahadev Temple in Solan Himachal Pradesh where devotees offer lit cigarettes to Lord Shiva
Lutru Mahadev Temple : देवाला चक्क दारू आणि सिगारेटचा नैवेद्य?
November 21, 2026
Indian Railways warns passengers against loud phone calls and music inside trains
Indian Railways Rule : रेल्वे प्रवाशांनो सावधान! रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलल्यास दंड अन् शिक्षेची तरतूद
November 21, 2026
Traditional One Village One Tulsi Vivah celebration at Hattarwad village in Khanapur, Karnataka.
Hattarwad One Village One Tulsi Vivah : ‘या’ गावची तुळस आहे राखणदारीण
November 20, 2026