LIVE UPDATES

Sindhudurg District Youth Festival 2026 : जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सिंधुदुर्गच्या युवा कलागुणांचा अविष्कार

लोककला, लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, कवितालेखन व पथनाट्य स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 08:40 PM
views 22  views
Participants performing traditional Konkan folk dances and cultural programmes at the Sindhudurg District Youth Festival 2026.

सिंधुदुर्गनगरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 20 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. तळकोकणातील लोककला, रूढी आणि परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी महोत्सवात रंगत आणली.

उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. दीपप्रज्वलन व नटराज मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी युवकांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या आवडीनुसार करिअरची दिशा निश्चित करण्याचे आवाहन केले. तसेच विकसित भारताच्या संकल्पनेत नशामुक्त युवा ही संकल्पना महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले.

महोत्सवामध्ये सिंधुदुर्गच्या युवा कलाकारांनी लोककला, लोकनृत्य आणि लोकगीतांच्या माध्यमातून तळकोकणातील समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविले. युवकांमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल असलेली आत्मीयता आणि कला-संस्कृतीच्या जतनाची जाणीव या सादरीकरणांतून प्रकर्षाने दिसून आली.

विविध स्पर्धांमधील सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण करण्यासाठी हार्दिक शिगले, हरिभाऊ भिसे, सचिन कोंडस्कर, महेश तळगांवकर, महेश जांभोरें, ऋतुजा मोरे, स्नेहा जांभोरे, राहुल परब, तुकाराम मोरजकर आणि विजयकुमार गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर पाचंगे यांनी केले.

दुपारच्या सत्रात जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांनाही आगामी स्पर्धांमध्ये अधिक जोमाने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्यांची विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा अंतिम निकालामध्ये सामूहिक लोकनृत्य : प्रथम – श्री स. ह. केळकर कॉलेज, देवगड; द्वितीय – एस. पी. के. ग्रुप, सावंतवाडी; तृतीय – श्री देव भैरव जोगेश्वरी ग्रुप, कणकवली, सामूहिक लोकगीत : प्रथम – रंगखांब लोककला मंच, कणकवली; द्वितीय – दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा; तृतीय – वामनराव महाडिक विद्यालय, तळेरे, कवितालेखन : प्रथम – आकांक्षा जाधव, सावंतवाडी; द्वितीय – लावण्या खोचरे, चित्रकला : प्रथम – राम बिबवणेकर, कुडाळ; द्वितीय – रुचिता वराडकर, मालवण; तृतीय – प्रथमेश वेंगुर्लेकर, कुडाळ, पथनाट्य : प्रथम – मयुनाट्य कला मंच, मालवण; द्वितीय – डॉन बॉस्को हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ओरोस, कुडाळ यांचा समावेश आहे.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, प्रविणा वानखडे, क्रीडा अधिकारी शितल शिंदे, क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, शिपाई रिया चव्हाण तसेच सिद्धांत रायकर, मंगेश माने, आशिष सावंत, सुप्रसाद यादव आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Zilla Parishad Standing Committee meeting discussing the release of eight teachers and proposed transfers of 28 Community Health Officers.
Sindhudurg News : सभागृहाच्या ठरावाला केराची टोपली? आठ शिक्षकांच्या कार्यमुक्तीवर स्थायी समितीत संताप
November 23, 2026
अवैध गोवा दारु विक्री प्रकरणी कणकवलीत एकावर कारवाई
November 23, 2026
District and Sessions Judge S. S. Indalkar distributing certificates to prisoners after completion of painting skill development training at Sindhudurg District Jail.
Sindhudurg Jail : कारागृहातील ४० बंदीवानांना पेंटिंग प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
November 23, 2026
बांदा शाखा कालव्याच्या साफसफाईला नेतर्डे येथून सुरुवात
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg Zilla Parishad Standing Committee meeting discussing the release of eight teachers and proposed transfers of 28 Community Health Officers.
Sindhudurg News : सभागृहाच्या ठरावाला केराची टोपली? आठ शिक्षकांच्या कार्यमुक्तीवर स्थायी समितीत संताप
November 23, 2026
District and Sessions Judge S. S. Indalkar distributing certificates to prisoners after completion of painting skill development training at Sindhudurg District Jail.
Sindhudurg Jail : कारागृहातील ४० बंदीवानांना पेंटिंग प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
November 23, 2026
बांदा शाखा कालव्याच्या साफसफाईला नेतर्डे येथून सुरुवात
November 23, 2026
तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण
November 23, 2026