
कणकवली : उबाठा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या वक्तव्याचा पालकमंत्री नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. कणकवली रेल्वेस्थानक येथे निवारा शेड लोकार्पण व लिफ्ट काम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंत्री राणे म्हणाले, तेव्हाचा शिवसेना पक्ष पूर्ण पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेत होता. तेव्हा सावरकरांविषयी काही बोलण्याचे धाडस संजय राऊत यांनी का केले नाही? सावरकरांविषयी संजय राऊत यांनी आता तरी बोलू नये. अन्यथा दहा जनपथ येथून राहुल गांधी यांच्याकडून येणारा त्यांचा पगार बंद होईल. संजय राऊत यांनी विचार करून थोबाड उघडावे, नाहीतर त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे होऊन जातील, असेही राणे म्हणाले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








