
कोलकाता : पश्चिम बंगालचे नाव बदलले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मांडण्याची तयारी सुरू आहे. सोमवारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आगामी विधानसभा अधिवेशनात राज्याचे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव ९ डिसेंबर रोजी सादर केला जाण्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
पश्चिम बंगालच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी एक घोषणा केली आहे. पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याचा प्रस्ताव ९ डिसेंबर रोजी विधानसभेत मांडला जाईल. विधानसभेत मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. पश्चिम बंगाल विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान आयोजित केले जाणार आहे.
विशेष म्हणजे २०१८ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारने विधानसभेत एकमताने ठराव मंजूर करून राज्याचे नाव बदलून 'बांग्ला' करण्याचा प्रस्ताव मांडला होता. (West Bengal Name Change)
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








