
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिलेल्या आदेशानुसार व दुष्काळजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाभरात वनराई बंधारे मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने वेंगुर्ला पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी व वेंगुर्ला तालुका पत्रकार संघ यांनी तुळस ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने तुळस रेवटीवाडी येथे बुधवारी (१४ ऑक्टोबर) श्रमदानाने वनराई बंधारा घातला. यावेळी डोंगरभागातून येणारे पाणी साठण्यासाठी वनतार खड्डाही मारण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी या बंधाऱ्याच्या ठिकाणी भेट देत कामाचे कौतुक केले. तुळस रेवटीवाडी येथे पंचायत समिती सभापती शंकर घारे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा वनराई बंधारा घालण्यात आला. तुळस जि. प. सदस्य सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, ग्रा. पं. सदस्य सचिन नाईक, सदस्य चरित्रा परब, दादा पांगम, राजू पांगम, विद्या माळकर, रामचंद्र परब, वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती सचिव विनायक वारंग, पत्रकार दाजी नाईक, महेंद्र मातोंडकर, सल्लागार प्रदिप सावंत, भरत सातोसकर, आपा परब, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, कनिष्ठ सहाय्यक महेश नाईक, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर, सखाराम सावंत, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रशांत भोगटे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे, पशुवैद्यकीय अधिकारी श्री. देसाई, जि. प. कनिष्ठ अभियंता प्रीतम पवार, कनिष्ठ अभियंता श्री. सावंत, अतुल तुळसकर, ग्रामीण पाणीपुरवठाचे परेश नाईक, सुशांत धर्णे, गोविंद आरमारकर, राजाराम कुंभार, शुभ्रा सातार्डेकर, अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते.













