
वैभववाडी : मुंबई को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभववाडी तालुका सहसंपर्कप्रमुख प्रसाद नारकर यांचा तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. शिवसेना कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, वसंत खानविलकर, लक्ष्मणहरावराणे, रोहित पावसकर, दिव्या पाचपुडे, अर्चना कोरगावकर, स्वप्नील रावराणे, जितेंद्र तळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना प्रसाद नारकर यांनी वैभववाडी तालुक्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.













