
देवगड : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील कोटकामते येथील इनामदार देवी भगवती संस्थान मंदिराला भेट देऊन श्री देवी भगवतीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भक्तनिवासाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जनरेटरचे लोकार्पण देखील करण्यात आले.
यावेळी मंदिर अध्यक्ष डॉक्टर मुकुल प्रभुदेसाई, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, भाजप जिल्हा चिटणीस संदीप साटम, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, जिल्हा परिषद सदस्य सौ सावी लोके, सभापती गणेश राणे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ ,बंड्या नारकर, पंचायत समिती सदस्य अंकुश ठूकरूल, नगरसेवक शरद ठूकरूल, खाजनवडकर,गुरु घाडी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










