LIVE UPDATES

सावंतवाडीतील भगवान महावीर दवाखान्यात दोन दिवसांत डॉक्टर उपलब्ध होणार

रुग्णांची गैरसोय दूर करण्याचे प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 20:13 PM
views 28  views

सावंतवाडी : येथिल इंदिरा गांधी संकुलातील भगवान महावीर दवाखान्यात येत्या दोन दिवसात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील असे आश्वासन प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला दिले.

1 ऑक्टोबर 2026 पासून नगरपालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. विशेषत बीपी, शुगर आदी पेशंटना नियमित उपचार, औषधे घ्यावी लागतात. पण, डॉक्टर नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा मुद्दा अभिनव फाऊंडेशनने प्रकर्षांने मांडला. यासंदर्भात श्री.औंधकर यांनी नगपालिकेच्या दवाखान्याच्या जागेत नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र सुरु होणार असल्याची माहिती दिली.