
सावंतवाडी : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शहरातील विविध नवरात्रौत्सव मंडळांना भेटी देत नवदुर्गेच दर्शन घेतले. यावेळी मंडळांकडून श्री. राणेच आदरातिथ्य करण्यात आले.
बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाच्या दुर्गा मातेचे दर्शन आम. निलेश राणे यांनी घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी यथोचित सत्कार केला. तसेच माठेवाडा येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट दिली असता अध्यक्ष नंदू गावडे यांनी त्यांचे स्वागत केले.
भटवाडी ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाला भेट दिली असता दिलीप भालेकर, कुणाल शृंगारे आदींकडून स्वागत करण्यात आले. तसेच रासाई कला क्रीडा नवरात्रोत्सव मंडळ जिमखाना येथे देवी दर्शन श्री. राणेंनी घेतल. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड सायली दुभाषी, स्नेहा नाईक, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडीस, क्लेटस फर्नांडीस, बंटी पुरोहित, माजी नगरसेवक गुरुदास मठकर, सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे, परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, संतोष मुंज यांच्यासह मंडळाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










