LIVE UPDATES

कीटकनाशक प्राशन केलेल्या उंबर्डे येथील तरुणाचा मृत्यू

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 19:42 PM
views 23  views

वैभववाडी : कीटकनाशक प्राशन केल्याने गंभीर प्रकृती असलेल्या उंबर्डे-मोपेरकरवाडी येथील मदन मनोहर कदम (वय २८) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी (ता. १४) रात्री ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. मदन याने ६ ऑक्टोबरला कीटकनाशक प्राशन केले होते.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मदन हा उंबर्डे येथील मोपेरकरवाडीमध्ये वडिलांसोबत राहत होता. ६ ऑक्टोबरला तो घरी एकटाच असताना त्याने कीटकनाशक प्राशन केले. ही बाब वडिलांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वाडीतील ग्रामस्थांच्या मदतीने मदनला तातडीने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

मात्र, मदनची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तेथून ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.गुरुवारी त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मदन याच्या पश्चात वडील आणि भाऊ असा परिवार आहे.