
देवगड : मशवी फाटा येथे गतिरोधक बसविण्याची मागणी अखेर नऊ महिन्यांनंतर पूर्ण झाली आहे. तेजस पेंडसे यांनी जानेवारी २०२५ मध्ये केलेल्या तक्रारी व मागणीनंतर मशवी फाट्यावर अखेर गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
या ठिकाणी वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी तेजस पेंडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मशवी फाट्यावर गतिरोधक बसविण्यात आल्याने या मागणीची पूर्तता झाली आहे. या कामासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे तेजस पेंडसे यांनी आभार मानले आहेत.













