LIVE UPDATES

कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 08:17 PM
views 37  views

​कुडाळ : कुडाळ शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या 'ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा' लोकार्पण सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. डाॅ. पाटील हॉस्पिटल समोरील नगरपंचायत उद्यान येथे झालेल्या या कार्यक्रमात, ज्येष्ठ नागरिक संघाचे चंद्रकांत अणावकर यांच्या हस्ते फीत कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

​यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, माजी जि.प. अध्यक्ष काका कुडाळकर, जि.प. सदस्य दिपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाश सावंत, सी.टी. कोचरेकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, नयना मांजरेकर, आफरील करोल, राजीव कुडाळकर यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

​कार्यक्रमात बोलताना आमदार निलेश राणे यांनी कुडाळ शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "कुडाळ हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असून ते दर्जेदार बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वाढते शहरीकरण लक्षात घेता पुढील ५०-१०० वर्षे पाणी व विजेची समस्या भासणार नाही, यासाठी नवीन नळपाणी योजना आणि २४ तास अखंडित वीज सेवा देणारी वीज व्यवस्था उभारण्यात येणार आहे."

​ज्येष्ठांच्या आशीर्वादाचे महत्त्व सांगत ते म्हणाले की, नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाची परतफेड विकासकामांच्या माध्यमातून केली जाईल. शहर सुंदर आणि दर्जेदार करण्यासाठी प्रसंगी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी मागे हटणार नाही. तसेच, शहरातील मच्छिमार्केट सुसज्ज उभारण्यात येणार असून, विरंगुळा केंद्रासमोर मंडप उभारण्यासाठी आमदार फंडातून तातडीने निधी दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील मुख्य रस्त्यासह फुटपाथ उभारण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाईल.

​कार्यक्रमात नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर म्हणाल्या, "ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्राची अनेक वर्षांची मागणी आज नगरपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखालीच आमची वाटचाल सुरू असून त्यांना हव्या त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आमचे कर्तव्य आहे."

​मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी आपले प्रास्ताविक करताना त्यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत नेहमीच सर्वतोपरी प्रयत्नशील राहील.

चंद्रकांत अनावकर यांनी  २०१४-१८ पासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर आज हे विरंगुळा केंद्र प्रत्यक्षात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच उद्यमनगर ते कुडाळ शहर आणि अभिमन्यू हॉटेल ते पंचायत समितीपर्यंत फुटपाथ व्हावा, आणि मच्छिमार्केट सर्वसोयींयुक्त करावे, अशा मागण्यांकडे आमदार राणे यांचे लक्ष वेधले. ​कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नवनिर्वाचित विरंगुळा केंद्राची पाहणी केली.


ताजी बातमी

View all

Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
देवगडच्या वाडातरमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीचा छापा
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
कुडाळमध्ये महिला बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचे वाटप
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
कुडाळमध्ये महिला बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचे वाटप
October 30, 2026
महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार
October 30, 2026