LIVE UPDATES

'वृत्तपत्र विक्रेतेच' वृत्तपत्रांचा कणा

५० वर्षांचा अभेद्य वसा आणि अहोरात्र मेहनत; 'कोकणसाद'तर्फे सावंतवाडीत वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्‍मान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 19:31 PM
views 20  views

सावंतवाडी : वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्रांचा कणा मानला जातो. आजच्‍या डिजीटल युगातही वृत्तपत्रे जीवंत ठेवण्‍याचे काम वृत्तपत्र विक्रेत्‍यांनी केले आहे, असे प्रतिपादन ‘कोकणसाद’चे मुख्‍य संपादक सागर चव्‍हाण यांनी केले. वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त ‘कोकणसाद’ मिडियातर्फे सावंतवाडी येथील ‘कोकणसाद’च्‍या प्रधान कार्यालयात वृत्तपत्र विक्रेत्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला. 

गेल्‍या ५० वर्षांपासून अविरत वृत्तपत्रांसाठी अहोरात्र मेहनत करून प्रत्‍येक वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचविणार्‍या  वृत्तपत्र विक्रेते अनंत माधव, अरूण वझे, रंजन बांदेकर, राघवेंद्र सावंत यांचा गुलाबपुष्‍प देऊन यथोचित सन्‍मान करण्‍यात आला. यावेळी विक्रेत्‍यांच्‍या वतीने अरूण वझे आणि अनंत माधव यांनी आपले मनोगत मांडले. त्‍यांनी आपल्‍या मनोगतात वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी किती मेहनत घ्‍यावी लागते, आणि वृत्तपत्रांची विश्‍वासार्हता कायम टिकविण्‍यासाठी केलेला संघर्ष आणि पार पाडलेल्‍या आपल्‍या भूमिकेला त्‍यांनी पैलू पाडले.  

या विशेष सोहळ्याला ‘दै. कोकणसाद’चे मुख्य उपसंपादक स्वप्नील परब, उपसंपादक लक्ष्मण आडाव, ‘कोकणसाद LIVE’च्या मुख्य उपसंपादक जुईली पांगम, उपसंपादक भगवान शेलटे, रजत सावंत, अनुजा कुडतरकर, मयुरेश राऊळ, अविनाश बांदेकर, रविकिरण राणे, वितरण प्रतिनिधी अश्पाक शेख यांच्यासह संपूर्ण ‘कोकणसाद’ मीडिया टीम उपस्थित होती. कार्यक्रमाचे अत्यंत नेटके सूत्रसंचालन जुईली पांगम यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वप्नील परब यांनी मानले.