LIVE UPDATES

दीक्षित फाउंडेशनतर्फे हिंदळे भंडाराडा शाळेला ५१ हजारांची देणगी

जि.प सदस्य सुनील पारकर यांच्या हस्ते बाल उद्यानाचे लोकार्पण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 16:18 PM
views 35  views

देवगड : स्थानिक समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या दीक्षित फाउंडेशनच्या वतीने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, हिंदळे भंडाराडा येथे विद्यार्थ्यांसाठी बाल उद्यानाकरिता ५१,००० रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली आहे. 

कै. नीलकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून ही  देणगी फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या कौतुकास्पद उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. या बाल उद्यानाचा नामफलक अनावरण व लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, हिंदळे भंडाराडा येथे नुकताच संपन्न झाला,

या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मान दीक्षित फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये स्वराजली बांदल, ध्रुवी हिर्लेकर, उर्वी खोत, मृण्मयी खडपे, आराध्य कुमठेकर, गौरांग मयेकर, प्रणव हिंदळेकर यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंचकावर जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, सरपंच मकरंद शिंदे,  दीक्षित फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, उपसरपंच रुपेश राणे,सुरेश देवळेकर, भगीरथ दुर्वास राणे, दयानंद तेली, मनोज जाधव,परेश खोत, मुख्याध्यापक धर्मराज धुरत, सहकारी शिक्षक श्री योगेश बांदल, श्रीम. शितल मयेकर, वैभव बिर्जे,मिताली हिर्लेकर,सेजल राणे,मंगेश मयेकर, राजेंद्र खोत,राजेश हिंदळेकर उपस्थित होते.