LIVE UPDATES

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदींशी थेट संवाद

२७ ऑगस्टला कणकवलीत विशेष कार्यक्रम ; राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘माय भारत’ आणि NSS चा संयुक्त उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 26, 2026 10:58 AM
views 63  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : दरवर्षी  २७ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘माय भारत’ (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS)* यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्ट २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद कार्यक्रम’ (Virtual Interaction Programme)* आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी देशभरात १६०० ठिकाणी थेट संवाद कार्यक्रमातून ८ लाख तरुणांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांना आणि विद्यार्थ्यांना खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे हा आहे.

कणकवलीत होणार आयोजन 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्रम दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे:एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली*या निवडक संस्थांमधील विद्यार्थी, एनएस एस स्वयंसेवक आणि तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध खेळाडूही सहभागी होणार आहेत. त्यामुळे तरुणांना यशस्वी खेळाडूंकडून प्रेरणा घेण्याची आणि समर्पण, शिस्त, चिकाटी व तंदुरुस्तीचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळेल.

तरुणांच्या कल्पनांना राष्ट्रीय स्तरावर वाव
या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘माय भारत’ आणि एनएसएस स्वयंसेवकांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रम, सामुदायिक तंदुरुस्ती कार्यक्रम, जनजागृती मोहिमा, सर्वसमावेशक क्रीडा कार्यक्रम, तरुणांच्या नेतृत्वाखालील फिटनेस उपक्रम आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या सर्जनशील कल्पनांचा समावेश असू शकतो.
स्वयंसेवकांकडून आलेल्या सर्वोत्तम आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची निवड करून त्यांची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे युवकांना केवळ कार्यक्रमात सहभागी होण्याचीच नव्हे, तर देशभरातील क्रीडा आणि तंदुरुस्ती चळवळ बळकट करण्यासाठी योगदान देण्याची संधी मिळणार आहे.

का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन?
भारतीय हॉकीचे जादूगार आणि महान खेळाडू *मेजर ध्यानचंद* यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा केला जातो.२७ऑगस्ट रोजी होणाऱ्या या व्हर्च्युअल संवाद कार्यक्रमाचे सुरळीत आयोजन करण्यासाठी ‘माय भारत सिंधुदुर्ग’ आणि एनएसएस विविध शैक्षणिक संस्था आणि घटकांशी समन्वय साधणार आहेत. हा उपक्रम युवक, खेळ, तंदुरुस्ती, नाविन्यपूर्णता आणि आरोग्यदायी व सक्रिय पिढीच्या जडणघडणीवर भारत सरकार देत असलेल्या भराचे प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात एकाच वेळी १६०० ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात ८ लाख युवकांना संबोधित करणार आहेत .