LIVE UPDATES

Government Job : पन्नाशी ओलांडली तरी मिळेल सरकारी नोकरी

पगार तब्बल ९२ हजार रुपयांपर्यंत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 30, 2026 07:10 PM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

नवी दिल्ली : तुम्ही सरकारी नोकरी करत असाल आणि देशाच्या प्रमुख तपास संस्थेत काम करण्याची संधी शोधत असाल, तर हि बातमी तुमच्यासाठी आहे.राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सहाय्यक उपनिरीक्षक (ASI), हेड कॉन्स्टेबल आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी एकूण १११ जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे ५६ वर्षांपर्यंतचे पात्र उमेदवार यात अर्ज करू शकतात.

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ₹२५,५०० ते ₹९२,३०० पर्यंत पगार मिळेल. ही भरती थेट भरती नसून प्रतिनियुक्तीच्या आधारावर घेतली जात आहे. अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाली असून, उमेदवार २० डिसेंबर २०२६ पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात. या सर्व पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.

एनआयएने (NIA) एकूण १११ सहाय्यक उपनिरीक्षक (ASI), हेड कॉन्स्टेबल आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे ५६ वर्षांपर्यंतचे पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.ही भरती थेट भरती नसून प्रतिनियुक्तीच्या आधारावर असून अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाली असून, उमेदवार २० डिसेंबर २०२६ पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात. राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकृत NIA Recruitment Notice या वेबसाइटवर जाऊन संबंधित पदाची जाहिरात आणि अर्जाचा नमुना तुम्ही डाऊनलोड करू शकता .


ताजी बातमी

View all

कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन
October 30, 2026
दिगवळेत दीड लाख किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीस
October 30, 2026
सावंतवाडीत मोबाईलवरून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
October 30, 2026
International swimmer Purva Gawade attends the 39th Sindhudurg District Police Sports Competition closing ceremony as chief guest.
कालची सरावपटू आज प्रमुख पाहुणी; पूर्वाच्या आठवणींनी पोलीस मैदान गहिवरले
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Supreme Court Recruitment 2026 for 20 Court Master Shorthand Posts
Job News : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! कोर्ट मास्टर पदाच्या २० जागांसाठी भरती
October 27, 2026
RRB Station Master Recruitment 2026 notification for 1,250 vacancies
रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२५० पदांसाठी भरती! २५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या पात्रता अन् पगार
October 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी
October 21, 2026
Recruitment 2026 : एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ५० पदांसाठी भरती, ५० हजार रुपये मिळणार स्टायपेंड
October 13, 2026