LIVE UPDATES

रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२५० पदांसाठी भरती! २५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या पात्रता अन् पगार

RRB Station Master Recruitment 2026 : स्टेशन मास्टर पदाची भरती नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पदवी-स्तरीय भरती प्रक्रियेअंतर्गत केली जात असे. दरम्यान, या वर्षापासून स्टेशन मास्टर पदाला एनटीपीसी भरती कॅटेगरीतून वगळण्यात आले आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: October 26, 2026 01:45 PM
views 207  views
RRB Station Master Recruitment 2026 notification for 1,250 vacancies

नवी दिल्ली : जर तुम्ही रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) 'स्टेशन मास्टर'च्या सुमारे १,२५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आरआरबीद्वारे यासंदर्भात एक नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर, २०२६ अशी आहे.

विशेष म्हणजे, स्टेशन मास्टर भरती परीक्षा घेण्याची जबाबदारी पहिल्यांदाच आरआरबी अजमेरकडे सोपवण्यात आली आहे. देशभरात एकूण २१ रेल्वे भरती बोर्ड आहेत. त्यामुळे या सर्व बोर्डांशी संबंधित उमेदवारांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी स्टेशन मास्टर पदाची भरती नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पदवी-स्तरीय भरती प्रक्रियेअंतर्गत केली जात असे. दरम्यान, या वर्षापासून स्टेशन मास्टर पदाला एनटीपीसी भरती कॅटेगरीतून वगळण्यात आले आहे.

असा करा अर्ज

सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट rrbapply.gov.in ला भेट द्या. त्यानंतर स्टेशन मास्टर भरतीशी (CEN 08/2026) संबंधित लिंक ओपन करा. दिलेल्या सूचनांचे पालन करून रजिस्टर (register) करा किंवा लॉग इन करा. ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. विहित अर्ज शुल्क भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट किंवा डिजिटल प्रत तुमच्याकडे ठेवा.

या पदांसाठी वेतन किती असेल?

स्टेशन मास्टरचे पद ७ व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) वेतन मॅट्रिक्सनुसार 'लेव्हल-६' (Level-6) मध्ये येते. या पदासाठी सुरुवातीचा मूळ पगार दरमहा ३५ हजार ४०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. तसेच नियमांनुसार इतर भत्तेही दिले जाऊ शकतात. सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल. 

अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे आधार कार्डवरील नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख ही त्यांच्या हायस्कूल (माध्यमिक) प्रमाणपत्रावरील तपशीलांशी जुळतात. जर डिटेल्समध्ये काही तफावत असेल तर अर्ज सादर करण्यापूर्वी ती आधार रेकॉर्डमध्ये दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी हेही खात्री करून घ्यावी की त्यांचा अलीकडील फोटो आणि बायोमेट्रिक डेटा अपडेटेड आहे. अर्ज रेल्वे भरती बोर्डाच्या पोर्टलवर rrbapply.gov.in द्वारे सादर केले जाऊ शकतात.

निवड प्रक्रिया?

'स्टेशन मास्टर' पदासाठी निवड प्रक्रियेत संगणक-आधारित परीक्षा (CBT), संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT), कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी या टप्प्यांचा समावेश असतो. 

उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या सर्व निर्धारित टप्प्यांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच, वैद्यकीय तपासणीदरम्यान विहित मानके पूर्ण करणे अनिवार्य आहे.

आरआरबी स्टेशन मास्टर भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?

रेल्वे भरती बोर्डाने वयाशी संबंधित पात्रता निकषांमध्ये सुधारणा केली आहे. स्टेशन मास्टर पदाच्या थेट भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षांवरून २० वर्षे करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादेत कोणताही बदल झालेला नाही; ती ३० वर्षेच कायम आहे.


ताजी बातमी

View all

महेश इंगळे यांच्या कार्याचा गौरव
October 26, 2026
भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार मैदानात, कधी अन् कुठे रंगणार सामना? वाचा सविस्तर
October 26, 2026
४५ महसूल लोक अदालतींमधून ५३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा
October 26, 2026
Upcoming OTT movies and web series releases on Netflix and JioHotstar this week
वीकेंडला काय पाहायचं? Netflix आणि JioHotstar वर रिलीज होणार नवीन चित्रपट अन् वेब सीरिज
October 26, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी
October 21, 2026
Recruitment 2026 : एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ५० पदांसाठी भरती, ५० हजार रुपये मिळणार स्टायपेंड
October 13, 2026
Indian Coast Guard Recruitment 2026 for 10th and 12th pass candidates
१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांसाठी भरती
October 09, 2026
ITBP Recruitment 2026 : १२वी पास तरुणांसाठी आयटीबीपीमध्ये नोकरीची संधी, अशी आहे निवड प्रक्रिया
October 01, 2026