
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन म्हणून डॉ. रुपेश कुमार झा हे सोमवारी दाखल झाले. रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. झा यांचे स्वागत केले. तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे त्यांनी या नियुक्तीसाठी आभार मानलेत.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, माजी सैनिक अधिकारी दीपक शिर्के, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी सौ. रूपाली हेळेकर आदी उपस्थित होते. डॉ. झा हे लातूर जिल्ह्यात सेवा करून आता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी दाखल झाले आहेत. ते पोटातील विकार तज्ञ असून त्यांची स्पेशालिटी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आहे.
अपेंडिक्स, हर्निया अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया त्या लॅप्रोस्कोपीद्वारे करतात. त्यासाठी लवकरच लॅप्रोस्कोपी यंत्रसामग्री सावंतवाडीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मार्फत मंजूर करून घेण्याचे आश्वासन रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी श्री. सूर्याजी यांनी दिले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








