
सिंधुदुर्गनगरी : थायरॉईड ग्रंथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गुढीपूर, ता. कुडाळ येथील ३९ वर्षीय महिला रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील शस्त्रक्रिया विभागामार्फत नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेमध्ये थायरॉईड ग्रंथीचा मोठा गलगंड झाल्यामुळे रुग्णाला अन्न गिळण्यास तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सदर महिला गेल्या १० वर्षांपासून थायरॉईड ग्रंथीच्या आजाराने त्रस्त होती. सुमारे आठ वर्षांपूर्वी गलगंडाची सुरुवात झाली होती. कालांतराने त्याचा आकार वाढून त्रास अधिक जाणवू लागल्याने रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर रुग्णाला ‘मल्टीनोड्यूलर गॉयटर’ (Multinodular Goitre) या आजाराचे निदान झाले. वाढता त्रास लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे तसेच शस्त्रक्रिया विभागाचे विभागप्रमुख डॉ. अनंत डवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. अनंत डवंगे, डॉ. निखिल जाधव, डॉ. अनिकेत वजराटकर आणि डॉ. निकिता मोंतेरो यांनी शस्त्रक्रियेत सहभाग घेतला.
बधिरीकरण विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सरिता ठाणेकर, डॉ. नूतन खरगे, डॉ. ओंकार जाधव, डॉ. यश कनबर, डॉ. धनश्री केने, डॉ. हितेश हदिया आणि डॉ. प्रगती भोसले यांनी बधिरीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
थायरॉईड ग्रंथीशी संबंधित आजार किंवा मानेवर गलगंडाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळीच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








