LIVE UPDATES

Blood Donation : दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 03:27 PM
views 49  views
Rasik Dalvi from Aros donates rare O Negative blood at Goa Medical College, Bambolim.

सावंतवाडी : न्हावेली येथील सुप्रसिद्ध वैद्य शशिकांत परब उर्फ कांता वेंगुर्लेकर यांना गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी), बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्मिळ अशा ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी आरोस येथील रसिक दळवी यांनी तत्परता दाखवत जीएमसी बांबोळी येथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.

रसिक दळवी हे ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित आणि नेहमीच मदतीसाठी तत्पर असणारे रक्तदाते आहेत. त्यांनी केलेले हे अकरावे रक्तदान ठरले. दुर्मिळ रक्तगटाची गरज ओळखून वेळेत धाव घेत त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, ही रक्तदानाची गरज पूर्ण होण्यासाठी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे आणखी एक दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते गजानन दळवी (रा.न्हावेली) यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्याबद्दलही संस्थेने आभार व्यक्त केले. ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी रसिक दळवी यांच्या या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले. रक्तदानातून माणुसकी जपणाऱ्या रसिक दळवी यांच्या कार्याला संस्थेतर्फे मानाचा मुजरा करण्यात आला.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानात सिंधुदुर्ग अग्रेसर राहील
November 18, 2026
Dry and cracked heels during winter with foot care products for smooth and soft skin.
Cracked Heels in Winter : हिवाळ्यात टाचांना पडतात भेगा? त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले 'हे' प्रभावी उपाय
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : न्यूमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्गात ‘SAANS अभियान’
November 12, 2026