LIVE UPDATES

Kankavli News : कणकवलीत सौरऊर्जा पथदिपांचे लोकार्पण

विद्युत रोषणाईने रस्ते झाले प्रकाशमय ; नागरिकांकडून समाधान व्यक्त
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 10:59 AM
views 70  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर परिसरातील महाराणा प्रताप चौक ते टेंबवाडीपर्यंत उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा पथदीपांचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. या पथदीपांमुळे संपूर्ण मार्ग विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून, परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रात्रीच्या वेळी या मार्गावर पुरेसा प्रकाश नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता सौरऊर्जा पथदीप सुरू झाल्याने रस्ता प्रकाशमय झाला असून, नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरपंचायतीच्या कामाचे स्वागत केले.

या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील विविध भागांमध्ये मूलभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने अशा विकासकामांना महत्त्व असून, सौरऊर्जा पथदीपांमुळे प्रकाश व्यवस्थेसोबतच ऊर्जाबचतीलाही हातभार लागणार आहे. या उपक्रमामुळे रवळनाथ मंदिर ते टेंबवाडी मार्गावरील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.