LIVE UPDATES

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानात सिंधुदुर्ग अग्रेसर राहील

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा विश्वास
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 01:33 PM
views 19  views

सावंतवाडी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच प्रशासन चांगलं काम करत असून राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची दखल घेतली जात आहे. 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानात देखील आपला जिल्हा अग्रेसर राहील. या अभियानात सावंतवाडी तालुक्याने देखील प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी मेहनत घेतली असून आमचही सहकार्य त्यांना राहील, अस मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केलं. सावंतवाडी येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. 

येथील बॅ नाथ पै सभागृहात माझं गाव आरोग्य संपन्न गाव तालुकास्तरीय कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना बीज देत वृक्षारोपणाचे आवाहन करण्यात आले. तसेच तालुक्यात माकडताप आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याने जनजागृती मोहीमेचाही शुभारंभ करण्यात आला.

माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५४ ग्रामपंचायतींचा समावेश घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विभागीय व जिल्हास्तरावर ग्रामपंचायत व उत्कृष्ट उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना बक्षीसे मिळणार आहेत.

७० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना 'आरोग्य संपन्न ग्राम' म्हणून घोषित केले जाणार आहे. जिल्हास्तरीय मुल्यांकनात प्रथम तीन ग्रामपंचायतीना 'आरोग्य प्रेरणा ग्राम', विभाग स्तरावर 'आरोग्य गौरव ग्राम' तर राज्यस्तरावर 'आरोग्य भूषण ग्राम' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ६५. २५ कोटी रुपयांची बक्षीस विविध पुरस्काराच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. त्यादृष्टीने प्रयत्नशील राहाण्याचे आवाहन आजच्या कार्यशाळेत उपस्थितांकडून करण्यात आले. 

मनोगतात श्री. कामत म्हणाले, आरोग्याच्या या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांनी तळागाळापर्यंत पोहचत यात लोकसहभाग वाढवण आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मिळून आणखीन प्रयत्न करावेत. या अभियानात माझ गाव नंबर एक वर असलं पाहिजे या जिद्दीने प्रयत्न करावे असे आवाहन केले. तसेच दुसरीकडे डेंग्यू, माकडताप सारखी संकट देखील आपल्यासमोर आहेत. त्यावर मात करून आपल्याला एक नंबर प्राप्त करायचा आहे‌‌.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मॉडेल संपूर्ण राज्यात चर्चील जात. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण एक नंबर आहोत तसेच आरोग्यातही राहू. माझा गाव आरोग्य संपन्न गाव अभियानात सावंतवाडी तालुका एक नंबर वर यावा यासाठी तालुक्याने मेहनत घेतली असून आमचंही सहकार्य आपल्याला राहिल अशा शुभेच्छा श्री. कामत यांनी दिल्या.

दरम्यान, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, माझा गाव आरोग्य संपन्न गाव यात आपला जिल्हा निश्चितच स्पर्धेमध्ये येणार आहे. आरोग्य विभागाने चांगल्या प्रकारचं काम केलं असून प्रत्येक पीएससी, ग्रामपंचायत, आशा सेविकांसह अधिकारी, कर्मचारी वर्गाचा यात सक्रिय सहभाग आहे‌. 

जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायत पैकी जवळपास दीडशेच्या आसपास ग्रामपंचायतीने 70% च्या वर गुण आजमितीस प्राप्त केलेत. वेंगुर्ला, सावंतवाडीत कार्यशाळा झाली असून येणाऱ्या काळात जिल्ह्याची देखील कार्यशाळा घेत या अभियानात अव्वल स्थान मिळवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. तर, माकडताप सारख्या आजारावर मात करण्यासाठी जनजागृती देखील करण्यात येत असल्याचे श्री. राऊळ यांनी सांगितले.

तसेच सभापती सुस्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश कर्तसरकर आदींनीही मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, मायकल डिसोझा, स्नेहा टिळवे, प्रियांका देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसरकर, जिल्हा पर्यवेक्षक शंकर परब आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

जुनी पेन्शनसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
November 18, 2026
कुडाळ शहर परिसरातील महामार्गावरील स्ट्रीट लाईट्स गणेश चतुर्थीपासून बंद
November 18, 2026
दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांचा रंगणार सुरेल कार्यक्रम
November 18, 2026
मुख्याध्यापक वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

Dry and cracked heels during winter with foot care products for smooth and soft skin.
Cracked Heels in Winter : हिवाळ्यात टाचांना पडतात भेगा? त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले 'हे' प्रभावी उपाय
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : न्यूमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्गात ‘SAANS अभियान’
November 12, 2026
Cancer Medicines Price Cut in India : कर्करोगावरील १३७ औषधे स्वस्त
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sawantwadi Maha Arogya Shibir : सावंतवाडीत १५ नोव्हेंबरला महाआरोग्य शिबिर
November 09, 2026