LIVE UPDATES

रेडीत आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

४८ रक्तदात्यांचे योगदान : कै. निलेश राऊळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 08:17 PM
views 29  views

वेंगुर्ला : कै. चंद्रकांत ऊर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ, रेडी यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. प्रितेश राऊळ मित्रमंडळाने सलग १५ व्या वर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन करून दिवंगत निलेश राऊळ यांच्या स्मृती जपण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम राखली.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

या प्रसंगी पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, रेडीचे सरपंच रामसिंग राणे, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र लीलखे, भाजप तालुकाध्यक्ष विष्णू ऊर्फ पप्पू परब, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, प्रियांका घाटवळ, अणसूरचे सरपंच सत्यविजय गावडे, शिरोड्याच्या सरपंच लतिका रेडकर, आरवलीचे सरपंच समीर कांबळी, सागरतीर्थचे सरपंच शेखर कुडव, रेडीचे उपसरपंच आनंद भिसे, सदस्य नमिता नागोळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, पांडुरंग नाईक, माजी सरपंच मनोज उगवेकर, ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाबल गावडे, डॉ. साळगावकर, कमलेश गावडे, जनआरोग्य समिती सदस्य राहुल गावडे, अमित गावडे, लक्ष्मीकांत कर्पे, कौशिक परब, मयूर आरोलकर, भूषण आंगचेकर, हितेश धुरी, तुषार साळगावकर, सागर राणे आदी उपस्थित होते.

आरोग्यसेवेचा वसा जपणारा उपक्रम

दिवंगत निलेश राऊळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रितेश राऊळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे सातत्याने आयोजन केले आहे. आरोग्यसेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ते वर्षानुवर्षे करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

दिवंगत निलेश राऊळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाही रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ४८ जणांनी रक्तदान केले. या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रितेश राऊळ यांनी आभार मानले.

रक्तदान चळवळीत योगदान देणाऱ्या मंडळांचा गौरव

रक्तदान चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि सामाजिक संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिबिरादरम्यान रक्तदान क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध मंडळांचा आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रामपुरुष मित्रमंडळ परबगाव-शिरोडा, ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना गांधी चौक शिरोडा, प्रितेश राऊळ मित्रमंडळ- रेडी, शिवप्रेमी मित्रमंडळ- आरवली टांक, नाईक वस मित्रमंडळ- रेडी गावठळेवाडी, दुर्गरक्षक प्रतिष्ठान  रेडी यशवंतगड, जय माऊली युवा मित्रमंडळ- तिरोडा, ग्रामपंचायत अणसूर, हौशी कला-क्रीडा मंडळ- अणसूर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-वेंगुर्ला, श्री सातेरी कला-क्रीडा मंडळ अणसूर, जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य संस्थान रत्नागिरी आणि फोमेंतो प्रा. लि. कंपनी यांचा समावेश होता.


ताजी बातमी

View all

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
November 02, 2026
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४२ हजार शोष खड्ड्यांचे उद्दिष्ट
November 02, 2026
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड. देवदत्त परुळेकर यांचा गौरव
November 02, 2026
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhu Jan Samvad Arogya Yatra Launch at Redi Primary Health Centre in Sindhudurg
Sindhu Jan Samvad Arogya Yatra : रेडी येथे सोमवारी ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’
October 31, 2026
वेंगुर्ल्यात १ नोव्हेंबर रोजी महारक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन
October 31, 2026
Vengurla News : आजारमुक्त होण्यासाठी योगाकडे वळा
October 29, 2026
Cancer medicine price reduction in India following NPPA revised retail prices
कॅन्सर उपचारांचा खर्च होणार कमी? औषधांच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवे दर
October 29, 2026