LIVE UPDATES

Sindhu Jan Samvad Arogya Yatra : रेडी येथे सोमवारी ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’

पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 05:24 PM
views 42  views
Sindhu Jan Samvad Arogya Yatra Launch at Redi Primary Health Centre in Sindhudurg

वेंगुर्ला : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’ या उपक्रमाचा शुभारंभ सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणीसह विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ‘सुदृढ परिवार, निरोगी समाज, सक्षम सिंधुदुर्ग’ हे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य यात्रेतून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

या आरोग्य यात्रेदरम्यान नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, आयुष्मान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयवंदना कार्ड आणि डिजिटल आरोग्य नोंदींसाठी आभा कार्ड यांसंबंधी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय नागरिकांना विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देऊन आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे. या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत रेडी, सेंट्रल ग्रामपंचायत प्राथमिक शाळा रेडी क्रमांक १, अंगणवाडी रेडी क्रमांक १, श्री माऊली विद्यालय माध्यमिक शाळा रेडी आणि सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा येथे भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, विविध योजनांचा लाभ मिळावा आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ही आरोग्य यात्रा राबविण्यात येत आहे. त्यामुळे रेडी व परिसरातील नागरिकांनी सोमवारी सकाळी ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडी येथे उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

देवगडमध्ये ६ नोव्हेंबरला ‘स्वरऋतू’ची दीपावलीपूर्व संगीत मैफल
October 31, 2026
आंबोली मंडलातील शिवसेनेच्या अनेक युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
October 31, 2026
विलवडे-वाफोलीतील बेकायदेशीर दगडखाणी व क्रशर बंद करा
October 31, 2026
India vs New Zealand 5th T20 Match Team India and New Zealand Cricket Teams
India vs New Zealand 5th T20 Match : रविवारी भारत-न्यूझीलंडमध्ये पाचवा टी-२० सामना
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

वेंगुर्ल्यात १ नोव्हेंबर रोजी महारक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन
October 31, 2026
Vengurla News : आजारमुक्त होण्यासाठी योगाकडे वळा
October 29, 2026
Cancer medicine price reduction in India following NPPA revised retail prices
कॅन्सर उपचारांचा खर्च होणार कमी? औषधांच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवे दर
October 29, 2026
National Deworming Campaign providing Albendazole tablets to children in Sindhudurg district
Sindhudurg Deworming Campaign : सिंधुदुर्गात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला ९५.५३ टक्के प्रतिसाद
October 28, 2026