LIVE UPDATES

नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह अन् झी 5 वर मनोरंजनाचा धमाका! २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान रिलीज होणार चित्रपट, वेब सीरिज

OTT Releases This Week : नेटफ्लिक्स, सोनीलिव्ह, प्राइम व्हिडिओ आणि झी ५ सारख्या विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर २ ते ८ नोव्हेंबर दरम्यान काही चित्रपट आणि वेब सिरिज रिलिज होणार आहेत.
Edited by: Rajat Sawant
Published on: November 02, 2026 01:46 PM
views 85  views
OTT Releases This Week November 2 to 8 on Netflix JioHotstar ZEE5 and SonyLIV

मुंबई : ओटीटी प्रेमींसाठी हा संपूर्ण आठवडा अतिशय रोमांचक असणार आहे. २ ते ८ नोव्हेंबर दरम्यान नेटफ्लिक्स (Netflix), सोनीलिव्ह (SonyLIV), प्राइम व्हिडिओ (Prime Video) आणि झी ५ (ZEE5) सारख्या विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चित्रपट आणि वेब सिरिज रिलिज होणार आहेत. यामध्ये हॉररपासून ते म्युझिकल रोमान्सपर्यंतच्या विविध शैलींचा समावेश आहे. 

दिलवाली दिवाळी (Dilwali Diwali)

हा विनोदी चित्रपट नेटफ्लिक्सवर ५ नोव्हेंबर रोजी रिलिज होणार आहे. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट असून यात मिहिर आहुजा, मनोज पाहवा, नीलू कोहली आणि ऑरा भटनागर यांसारखे कलाकार आहेत. 

कौरीबुरी मंदिर (द कर्सड टेम्पल ऑफ कौरीबुरी)

बंगाली हॉरर-थ्रिलर सिरिज नेटफ्लिक्सवर ६ नोव्हेंबर रोजी रिलिज होणार असून याचे सायनतन घोषाल यांनी दिग्दर्शन केले आहे.

ॲनेस्थेशिया (Anesthesia)

ही ड्रामा वेब सिरिज नेटफ्लिक्सवर ४ नोव्हेंबर रोजी रिलिज होणार आहे. ही एक पोलिश मेडिकल ड्रामा सिरिज आहे. 

बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani)

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ऐतिहासिक प्रेमकथा असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ३ नोव्हेंबर रोजी रिलिज होत आहे. यात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.

गोलियों की रासलीला: राम-लीला (Goliyon Ki Raasleela: Ram-Leela)

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित रोमँटिक म्युझिकल चित्रपट नेटफ्लिक्सवर ३ नोव्हेंबर रोजी रिलिज होणार आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. 

मिनियन्स अँड मॉन्स्टर्स (Minions & Monsters)

हा विनोदी चित्रपट जिओ हॉटस्टार २ नोव्हेंबर रोजी रिलिज होत आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांत उपलब्ध आहे. 

मोटू-पतलू अँड द मिस्ट्री ऑफ नागमाणी (Motu-Patlu and the Mystery of Nagmani)

हिंदी ॲनिमेटेड विनोदी चित्रपट जिओ हॉटस्टारवर (Jio Hotstar) ८ नोव्हेंबरला रिलिज होत असून यात मोटू आणि पतलू, खलनायक 'जॉन द डॉन'चा पाठलाग करत असताना चुकून एका 'टाइम पोर्टल'मध्ये पोहोचतात.

नूरु कोडी वानविल (Nooru Kodi Vaanavil)

शशी दिग्दर्शित एक तमिळ रोमँटिक चित्रपट ६ नोव्हेंबर रोजी झी 5 वर रिलिज होत आहे. याची कथा 'विनो' नावाच्या तरुणाभोवती फिरते. जो चांगल्या संधींच्या शोधात गोव्याला जातो. 

मीसाया मुरुक्कू २ (Meesaya Murukku 2)

हा चित्रपट सोनीलिव्हवर ६ नोव्हेंबर रोजी रिलिज होत असून याची कथा तीन पिढ्यांच्या संगीतकारांच्या प्रवासावर आधारित आहे. 


ताजी बातमी

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#Omkar The Elephant
Omkar Elephant : थेट घरात सोंड घालून भात खाण्याचा प्रयत्न
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

देवगडमध्ये ६ नोव्हेंबरला ‘स्वरऋतू’ची दीपावलीपूर्व संगीत मैफल
October 31, 2026
३५ हजार फूट उंचीवर करवा चौथ! परिणीती-राघवने विमानातच साजरा केला सण, रोमँटिक व्हिडिओ व्हायरल
October 30, 2026
Akshay Kumar and Raveena Tandon in Mohra movie re-release news
रणबीरच्या 'रामायण'समोर अक्षय कुमारचा 'मोहरा'! ३२ वर्षांनंतर चित्रपटाची 4K व्हर्जनमध्ये थिएटरमध्ये दमदार एंट्री
October 28, 2026
Santosh Guldhuvekar performing the devotional Yedamai Dashavatar segment with the traditional Arolkar Dashavatar Natya Mandal of Aravali, Konkan.
येडामायचा महिमा…संतोष यांच्या आवाजात उलगडला भक्तीचा दशावतार!
October 27, 2026