LIVE UPDATES

भारतीय बाजारात १३ हजारांपेक्षा कमी किमतीत 'कार्बन'चे दोन स्मार्टफोन लॉन्च, ७००० एमएएच बॅटरीसह मिळणार खास फीचर्स

Karbonn Rebel and Rebel Pro : 'कार्बोन रेबेल'मध्ये ६.७५ इंचाची एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले ९० हर्टझ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात ७००० एमएएचची मोठी बॅटरी आणि फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा एआय कॅमेरा देण्यात आला आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 06:04 PM
views 298  views
Karbonn Rebel and Karbonn Rebel Pro smartphones launched in India with 7000mAh battery and 64MP camera.

मुंबई : स्वदेशी मोबाईल निर्मिती कंपनी 'कार्बन' (Karbonn) पुन्हा एकदा स्मार्टफोन क्षेत्रात परतली आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपल्या नवीन 'रेबेल' (Rebel) सिरिजअंतर्गत 'कार्बन रेबेल' (Karbonn Rebel) आणि 'कार्बोन रेबेल प्रो' (Karbonn Rebel Pro) हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही फोनची किंमत १३ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ॲमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असतील. 

यापैकी एका मॉडेलमध्ये ७००० एमएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये ६४ मेगापिक्सल कॅमेरा आणि १२० हर्टझ रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. 

'कार्बोन रेबेल'ची मूळ किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, लॉन्च ऑफरमध्ये हा स्मार्टफोन ११ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. १ हजार रुपयांच्या अतिरिक्त बँक ऑफरसह याची किंमत १०,९९९ रुपयांपर्यंत खाली येते. 'कार्बोन रेबेल प्रो'ची किंमत १४,९९९ रुपये आहे. तो १२ हजार ४९९ रुपयांच्या लॉन्च किमतीत उपलब्ध आहे आणि १,००० रुपयांच्या बँक ऑफरचा लाभ घेतल्यास तो ११ हजार ४९९ रुपयांना मिळू शकतो. हे दोन्ही स्मार्टफोन ऍमेझॉनवर उपलब्ध असतील.

'कार्बन रेबेल'चे फिचर्स

'कार्बोन रेबेल'मध्ये ६.७५ इंचाची एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले ९० हर्टझ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात ७००० एमएएचची मोठी बॅटरी आणि फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा एआय कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ जी 81 (MediaTek Helio G81) प्रोसेसरवर रन करतो आणि यात अँड्रॉइड १६ (Android 16) ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन तीन कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

'कार्बन रेबेल प्रो'चे फिचर्स

'कार्बोन रेबेल प्रो'मध्ये ६००० एमएएचची बॅटरी आहे. या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे याचा ६४ मेगापिक्सल एआय ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप. यामध्ये 'ट्रिपल-रिंग' डिझाइन देण्यात आले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या डिस्प्लेमध्ये १२० हर्ट्झ (120Hz) रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामुळे स्क्रोलिंग करणे अधिक सुरळीत होते. यात मीडियाटेक हेलिओ जी८१ (MediaTek Helio G81) प्रोसेसर असून तो अँड्रॉइड १६ (Android 16) वर रन करतो. हा फोन 'चेरी रेड' (Cherry Red) सह एकूण चार कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : भाग्योदय कॉम्प्लेक्समधील सदस्यांची श्रमदानातून स्वच्छता
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी आर्थिक मदत
November 02, 2026
Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.
Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल
November 02, 2026
Rajapur's Riya Mukesh Mayekar wins a gold medal at the Mumbai University Intercollegiate Taekwondo Championship 2026-27.
आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत रिया मयेकरला सुवर्णपदक
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.
Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल
November 02, 2026
Hero Destini 110 Classic Edition scooter launched in India with new retro design, colour options and 110cc engine.
हिरोची नवीन 'डेस्टिनी ११० क्लासिक एडिशन' लॉन्च, नवा रेट्रो लूक अन् दमदार प्रीमियम फीचर्स; जाणून घ्या खासियत
November 02, 2026
Dog Dressed in Traditional Royal Costume During China's Dog Carrying Festival in Miao Village
China Dog Carrying Festival : येथे कुत्र्याला राजेशाही मान...
October 31, 2026
Trans Bharat Aviation helicopter reported missing while flying from Badrinath to Dehradun with six people on board.
बद्रीनाथहून डेहराडूनला जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता! वैमानिकासह ६ जणांचा समावेश; एसडीआरएफ, लष्कराकडून शोधमोहीम सुरू
October 30, 2026