
सिंधुदुर्ग : एका नराधमाने महाराष्ट्र राज्यातील विविध न्यायालयाच्या वेबसाईटवर मेल करून बॉम्बचा वापर करून न्यायालय उडवून देणार अशी भ्याड धमकी दिली. न्यायालयीन कामकाजात विनाकारण व्यत्यय आणला. हे कृत्य निषेधार्थ असुन त्या बद्दल जिल्हा वकील संघटनेच्यावतीने या दृषकृत्याबद्दल तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड परिमल नाईक यांनी दिली.
सर्व वकील बंधु -भगिनींना आवाहन करण्यात आले की, या डरपोक कृत्याला न घाबरता आपलं न्यायालयीन कामकाज आपण सुरळीतपणे चालू ठेवावं असं आवाहन जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक व पदाधिकारी यांनी केलं आहे. एका नराधमाने महाराष्ट्र राज्यातील विविध न्यायालयाच्या वेबसाईटवर मेल करून बॉम्बचा वापर करून न्यायालय उडवून देणार अशी भ्याड धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








