LIVE UPDATES

मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड. देवदत्त परुळेकर यांचा गौरव

अभिनेत्री रोहिणी हट्टगडी, मुंबई म.न.पा.आयुक्त अश्विनी भिडे यांची उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 08:38 PM
views 22  views

वेंगुर्ले : प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'आजच्या काळासाठी तुकोबा' या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तथा सिंधुदुर्गातील संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि ज्येष्ठ विधिज्ञ तसेच मालवण बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई गिरगाव साहित्य संघात मुंबई मराठी साहित्य संघाचा प्रतिष्ठेचा वि. स. पागे आध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव साहित्य संघात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सदर पुरस्काराने ख्यातनाम अभिनेत्री रोहिणी हट्टगडी आणि संघाच्या सेक्रेटरी प्रतिभा सराफ यांच्या हस्ते ॲड. देवदत्त परुळेकर यांना गौरविण्यात आले.

रोख १० हजार रुपये आणि विठ्ठल रखुमाई मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या संत साहित्य, अध्यात्म आणि वारकरी परंपरेतील त्यांचा सखोल अभ्यास आणि विपुल वाङ्मयीन योगदानाचा गौरव करण्यात आला. 'एक तरी ओवी अनुभवावी', 'तुका म्हणे', 'नामा म्हणे', 'एका जनार्दनी', 'आजच्या काळासाठी तुकोबा' यांसह त्यांचे १० हून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. या सगळ्या योगदानामुळे सदर पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पुरस्कार वितरणानंतर संघाचे माजी अध्यक्ष न. र. फाटक, प्रभाकर पाध्ये, गंगाधर गाडगीळ, मधु मंगेश कर्णिक आदी साहित्यिकांच्या साहित्यातील निवडक उताऱ्यांच्या अभिवाचनाचा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय मोने, श्रीनिवास नार्वेकर, राजन ताम्हाणे आणि सुप्रिया विनोद हे होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगणचे विश्वस्त अरविंद परुळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
November 02, 2026
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४२ हजार शोष खड्ड्यांचे उद्दिष्ट
November 02, 2026
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
November 02, 2026
रेडीत आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
November 02, 2026
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४२ हजार शोष खड्ड्यांचे उद्दिष्ट
November 02, 2026
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
November 02, 2026
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
November 02, 2026