
वेंगुर्ला : दिवसेंदिवस आपल्या आजूबाजूला मधुमेह असलेल्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे. आजारमुक्त होण्यासाठी आपल्या खाण्यावर ताबा असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने आपला आहार सांभाळून योगाकडे वळले पाहिजे. योग शिबिरात प्रवेश घेताना भरपूर फी भरावी लागते. परंतु, नागरीकांच्या हितासाठी हे शिबिर मोफत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद आणि डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमी, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मोफत मधुमेह योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आज २९ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश रेगे, लायनेस क्लबच्या ज्येष्ठ पदाधिकारी हेमा गावस्कर, निला यरनाळकर, जि.प.सदस्य सुजाता पडवळ, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष ज्योती देसाई, डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमीच्या डॉ.वसुधा मोरे,
नगरसेवक रविंद्र शिरसाठ, सचिन शेटये, गौरी माईणकर, रिया केरकर, आकांक्षा परब, शितल आंगचेकर, काजल कुबल, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांच्यासह डॉ.सई लिंगवत तसेच सेवानिवृत्त शिक्षक बाबूराव खवणेकर व सेवानिवृत्त शिक्षिका खानोलकर उपस्थित होते.
मोफत योग शिबिर हा स्तुत्य उपक्रम आहे. सात दिवसांत जी योगासने आपण शिकणार आहात ती योगासने शिबिरानंतरही अविरत सुरू ठेवा असे प्रकाश रेगे यांनी सांगितले. तर धकाधकीच्या जीवनात आपण जगणेच विसरून गेलो आहोत. याचा विपरीत परिणाम आपल्या शरिरावर जाणवू लागला आहे. वेगवेगळ्या व्याधींना आपण बळी पडत आहोत. हे टाळण्यासाठी विश्रांती महत्त्वाची आहे असा सल्ला बाबूराव खवणेकर यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वसुधा मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक रामा पोळजी यांनी तर आभार निला यरनाळकर यांनी मानले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








