LIVE UPDATES

Jana Nayagan : थलपथी विजयच्या शेवटच्या ‘जन नायकन’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी

'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, 'छावा' सिनेमालाही पछाडले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 26, 2026 13:38 PM
views 57  views

Jana Nayagan News : दक्षिणात्य अभिनेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय (Thalapathy Vijay) यांचा 'जन नायकन' हा चित्रपट गुरुवारी 23 जुलै रोजी प्रदर्शित झाला. अभिनेता म्हणून त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही हे त्यांच्या नवीन चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून स्पष्ट होते. तसेच तरुण थिएटरमध्ये जल्लोष करतानाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

'जना नायकन' (Jana Nayagan) या चित्रपटाच्या प्रदर्शनास अनेक अडथळ्यांमुळे विलंब झाला. सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने तसेच थलपती विजय तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत व्यस्त झाल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यास बराच काळ लागला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत चांगली कामगिरी केल्यानंतर, हा चित्रपट आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

जना नायकन चित्रपट जगभरात प्रदर्शित झाल्यानंतर जगभरातून तब्बल 172 कोटींची कमाई केली. सकारात्मक प्रतिसाद पाहता ओपनिंग वीकेंड संपेपर्यंत हा चित्रपट 200 कोटींचा जागतिक टप्पा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. चित्रपटाचे शोज अनेक ठिकाणी हाऊसफुल झाल्याने चित्रपटाचे तिकिट मिळणे कठीण झाले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री पूजा हेगडे हिच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहेत तर चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोद यांनी केले आहे.  विशेष म्हणजे, थलपती विजयने २०२४ मध्येच अभिनय क्षेत्राचा निरोप घेण्याची आणि 'जना नायकन' हा आपला अखेरचा चित्रपट असेल, अशी घोषणा केली होती.