LIVE UPDATES

शेठ म. ग. हायस्कूलला ११ हजारांची देणगी

रतिकांत परब यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 20:40 PM
views 22  views

देवगड : देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलचे माजी विद्यार्थी रतिकांत परब यांनी शाळेला ११ हजार रुपयांची देणगी देत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. रतिकांत परब हे १९७५च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी असून, त्या वर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्यांनी देवगड केंद्रातून प्रथम क्रमांक मिळविला होता. सध्या त्यांचे वास्तव्य मुंबई येथे असून, देवगड तालुक्यातील तारामुंबरी हे त्यांचे मूळ गाव आहे.

शाळेला भेट देत त्यांनी शाळेच्या विकासासाठी ११ हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी माजी मुख्याध्यापक तथा माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, माजी विद्यार्थी संघाचे कोषाध्यक्ष तथा शाळेचे वरिष्ठ लिपिक शशांक साटम उपस्थित होते.

शाळा व संस्थेच्या वतीने गुलाबपुष्प आणि आभारपत्र देऊन रतिकांत परब यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण घेतलेल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी शाळेच्या उपक्रमांना हातभार लावला.