LIVE UPDATES

खवळे महागणपतीच्या दर्शनासोबत दुर्मिळ देशांतर्गत नाणी, नोटांचे प्रदर्शन

देवगड तारामुंबरी येथे १४ ते २५ या कालावधीत आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 20:50 PM
views 32  views

देवगड : देवगड शहरापासून लागून राहिलेल्या तारामुंबरी गावचे सुपुत्र विजय खवळे हे म.ना.पा शाळेतून सेवानिवृत्त झाले. त्यांनी स्वकर्तृत्वावर विद्यार्थीप्रिय शिक्षक, कबड्डी प्रशिक्षक, तसेच पर्यावरणप्रेमी म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी मुंबईच्या उपनगरात कलागुणांना वाव द्यावा यासाठी प्रयत्नशील राहिले.

विद्यार्थ्यांना, जिज्ञासू पालकांना मार्गदर्शन करावे हा हेतू ठेवून ते आजही कार्यरत आहेत. मग माझ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडवी या उद्देशाने त्यांनी देश आणि देशांतर्गत चलन दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकीटे "अष्टांग शैक्षणिक नोटा संग्रह' या माध्यमातून दहा शैक्षणिक विषयांचे सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रदर्शन १४ ते २५ सप्टेंबर रोजी शिवबा सदन श्री खवळे महागणपतीच्या शेजारी तारामुंबरी येथे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत आयोजित केले आहे‌.

हे प्रदर्शन गणेशभक्तांना, कलाप्रेमी सर्वांना पाहता येणार आहे. सदर प्रदर्शन हे अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार असून यामध्ये १५ आगस्ट १९४७ आजपर्यंतच्या नाणी नोटांचा समावेश असून १९४७ नंतर RBi व unc नाणी नोटा त्याप्रमाणे २२० देशांची नाणी, नोटा विविध प्रकारची रंगीत नाणी, नोटा व पोस्टाची तिकीटे भारतातील जुनी संस्थानं व जुनी राजांची नाणी, भारतीय प्राचीन काळ मौल्यवान व दुर्मिळ नाणी, इंग्रज काळातील टोकन, काँईस, नोटा, नाणी तसेच जगातील सर्व जुन्या काळातील देशांचे राजचिन्हे, झेंडे, एकंदरीत ३०० देशाच्या नाणी नोटा, पोस्ट तिकीट पाहणे शक्य होणार आहे. आपण खवळे महागणपतीचे दर्शन घ्या पण शिवबा सदन मध्ये आयोजित मोफत प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आणि संयोजक विजय खवळे यांनी केले आहे.