LIVE UPDATES

Netflix Releases This Week: नेटफ्लिक्सवर 'या' आठवड्यात रिलिज होणार 'हे' चित्रपट अन् सिरिज

New OTT releases : येत्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर 8 सिरिज तसेच चित्रपट रिलिज होणार आहेत. त्यामुळे ओटीटी प्रेक्षकांसाठी ही एक चांगली पर्वणी ठरणार आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 07, 2026 17:12 PM
views 90  views

मुंबई : येत्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर 8 सिरिज तसेच चित्रपट रिलिज होणार आहेत. त्यामुळे ओटीटी प्रेक्षकांसाठी ही एक चांगली पर्वणी ठरणार आहे. तर चला जाणून घेऊया नेटफ्लिक्सवर या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या सिरिज तसेच चित्रपटांबाबत...

मैं वापस आऊंगा

दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा 'मैं वापस आऊंगा' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट १२ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यात वेदांग रैना, शर्वरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत. भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा ७ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर रिलिज झाली आहे.

'डेथ इंक.' (सीझन ४)

स्पॅनिश कॉमेडी वेब सिरीज 'डेथ इंक.' चा शेवटचा चौथा सीझन ७ ऑगस्ट २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज झाला. या शेवटच्या सीझनमध्ये सहा भाग आहेत.

द लास्ट हाऊस

चौघांच्या एका कुटुंबाला अचानक आपल्याच घरात अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होते आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरत नाही. या भयावह संकटाचा सामना करण्यासाठी त्यांना एकत्र यावे लागते. द लास्ट हाऊस हा अमेरिकन हॉरर साय फाय चित्रपट ७ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज होत आहे.

ऑपरेशन सफेद सागर 

'ऑपरेशन सफेद सागर' ही १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने राबवलेली एक ऐतिहासिक हवाई मोहीम होती. ओनी सेन दिग्दर्शित हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज होत आहे.

अवर स्टिकी लव्ह

ही रोमँटिक कोरियन ड्रामा सिरीज आहे. यात एका वकिलाची कथा आहे. ही सिरीज ७ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज होत आहे.

रिकी गेरवाईस ॲली कॅट्स 

'रिकी गेरवाईस ॲली कॅट्स ' हा एक ॲनिमेटेड कॉमेडी चित्रपट आहे. रस्त्यांवर भटक्या मांजरांनी धुमाकूळ घातल्यावर निर्माण होणाऱ्या विचित्र आणि गमतीशीर परिस्थितींचे चित्रण यात करण्यात आले आहे. ही सिरिज ७ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज होत आहे.

इधयम मुरली

बॉक्स ऑफिसवरील रिलिजनंतर 'इधयम मुरली' हा तमिळ चित्रपट आता ओटीटीवर रिलिज झाला आहे. तो ७ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज झाला. तमिळ व्यतिरिक्त, हा चित्रपट हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही पाहता येईल.

द रिबन हिरो 

'द रिबन हिरो' ८ ऑगस्ट २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज होईल. हा एक आगामी जपानी ॲनिमे चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'ट्विन इंजिन'ने केले आहे.