LIVE UPDATES

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्या दिवशीही कोटींची कमाई; जाणून घ्या आतापर्यंतचे कलेक्शन

Ramayana Movie : 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 06, 2026 06:08 PM
views 119  views
Ranbir Kapoor as Lord Rama in Nitesh Tiwari's Ramayana movie.

मुंबई : रणबीर कपूरचा 'रामायण' हा २०२६ मधील सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रणबीर कपूरला प्रभू रामाच्या भूमिकेत आणि यशला रावणाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते विशेष उत्सुक होते. हा चित्रपट गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो चर्चेचा विषय ठरला आहे. दमदार ॲडव्हान्स बुकिंग आणि पहिल्या दिवशीच्या जबरदस्त कमाईमुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा प्रभाव पाडला आहे. आता दुसऱ्या दिवसाची सुरुवातीची कमाई समोर आली आहे. 'रामायण'चा दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीदरम्यान प्रदर्शित होणार आहे.

'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६४.८५ कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली. 'सॅकनिल्क' (Sacnilk) च्या अहवालानुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत 'रामायण'ने १४.९९ कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतात या चित्रपटाची एकूण कमाई आता ७९.८४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'ला समीक्षक आणि चाहते अशा दोघांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 'रामायण' चित्रपटात लारा दत्ता, अरुण गोविल आणि रकुल प्रीत सिंग यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दोन भागांत विभागलेली ही महागाथा हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून ती आयमॅक्स मध्येही प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. 

(डिस्क्लेमर : या बातमीत दिलेली बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी आणि डिटेल्स विविध मीडिया रिपोर्टसनुसार आणि इतर स्रोतांवर आधारित आहेत. प्रत्यक्ष आकडेवारी वरील अंदाजांपेक्षा वेगळी असू शकते. या आकडेवारीला अधिकृत डेटा म्हणून पुष्टी देत ​​नाही.)


ताजी बातमी

View all

मालवणमधील २०५ घरेलू कामगारांना दिवाळीची भेट
November 06, 2026
उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’
November 06, 2026
देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा
November 06, 2026
स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार
November 06, 2026
संबंधित बातम्या

View all

Ayushmann Khurrana Radhika Apte and Tabu in Andhadhun crime thriller movie
ओटीटीवर पाहा आयुष्मान खुरानाचा जबरदस्त क्राईम थ्रिलर चित्रपट
November 04, 2026
OTT Releases This Week November 2 to 8 on Netflix JioHotstar ZEE5 and SonyLIV
नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह अन् झी 5 वर मनोरंजनाचा धमाका! २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान रिलीज होणार चित्रपट, वेब सीरिज
November 02, 2026
देवगडमध्ये ६ नोव्हेंबरला ‘स्वरऋतू’ची दीपावलीपूर्व संगीत मैफल
October 31, 2026
३५ हजार फूट उंचीवर करवा चौथ! परिणीती-राघवने विमानातच साजरा केला सण, रोमँटिक व्हिडिओ व्हायरल
October 30, 2026