
सिंधुदुर्ग : सह्याद्रीच्या कुशीतून, वाळूच्या प्रत्येक कणातून आणि कोकणच्या लाल मातीतून सातासमुद्रापार पोहोचलेला 'दशावतार' हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मयूरपंख! कलेची ती तपश्चर्या, भक्तीचा तो दिव्य संगम आणि ६ देशांच्या गौरवाचा तिलक माथी मिरवणारी आपली अस्मिता आज जागतिक क्षितिजावर दिमाखाने झळकली आहे. याच तेजोमय परंपरेचा खरा शिलेदार राजपुत्र आणि नारदाची भूमिका सजीव करून रंगमंच वैकुंठाचा दरबार भासवणारे सिद्धहस्त कलावंत डॉ. गौरव शिर्के यांना यंदाचा मानाचा 'कोकण कलारत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाण्याच्या सावरकर नगरमध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोजक-नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली रंगलेल्या दिमाखदार 'मालवणी महोत्सवात' ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कोकणरत्न पुरस्कार गौरव शिर्के यांना बहाल करण्यात आला.
कोकणच्या मातीतून उमललेला 'दशावतार' हा कलेचा मयूरपंख आज जागतिक क्षितिजावर दिमाखाने नाचतोय! महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा आता थेट 'वर्ल्ड एक्सलन्स बुक रेकॉर्ड' मध्ये सुवर्णाक्षरी कोरला गेला आहे. सावंतवाडीच्या गोठण भागातून आलेल्या गौरव शिर्के यांनी गेली १७ वर्षं या कलेची अहोरात्र तपश्चर्या केली आहे.
१६ जिल्हास्तरीय आणि १९ राज्यस्तरीय पारितोषिके पटकावल्यानंतर, आता त्यांच्या या अलौकिक कर्तृत्वाने सातासमुद्रापार मोहोर उमटवली आहे. सह्याद्रीच्या कुशीतून, वाळूच्या प्रत्येक कणातून आणि कोकणच्या लाल मातीतून सातासमुद्रापार पोहोचलेला 'दशावतार' हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मयूरपंख! कलेची ती तपश्चर्या, भक्तीचा तो दिव्य संगम आणि ६ देशांच्या गौरवाचा तिलक माथी मिरवणारी आपली अस्मिता आज जागतिक क्षितिजावर दिमाखाने झळकली आहे, त्यात गौरव यांचा मोठा वाटा आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








