LIVE UPDATES

DARYAA Short Film IFFI 2026 : कोकणचा ‘दर्या’ झळकणार इफ्फीच्या मंचावर

सावंतवाडीतील नाट्यकलाकार जयप्रकाश सावंत व नातू शिवांश प्रमुख भुमीकेत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 03:07 PM
views 71  views
DARYAA short film directed by Kishor Arjun, selected for the 57th International Film Festival of India 2026.

सावंतवाडी : जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि सागरेश्वर परिसरात संपूर्ण चित्रीकरण झालेल्या ‘दर्या’ या लघुपटाची ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निवड झाली आहे. इफ्फीच्या ‘द गोवन डिरेक्टर कट’ या विशेष विभागात या लघुपटाला स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, या लघुपटातील सर्व कलाकार स्थानिक असून, बहुतांश कलाकारांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर अभिनय केला आहे. सेरेब्रल पाल्सी झालेल्या मुलाचे आयुष्य, त्याचे भावविश्व आणि त्याच्याशी जोडलेल्या नात्यांमधील भावनिक पैलू या लघुपटात मांडण्यात आले आहेत.(Indian International Film Festival 2026)

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षण मंडळाने निवडलेल्या १२ गोमंतकीय चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीत ‘दर्या’ या किशोर अर्जुन लिखित आणि दिग्दर्शित लघुपटाचाही समावेश आहे. ‘द गोवन डिरेक्टर कट’ या विशेष विभागातील निवडीमुळे सिंधुदुर्गातील स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या या कलाकृतीला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान मिळाले आहे.

परवेझ मोमीन यांच्या ‘मोमीन अँड सन्स चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन’ने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या लघुपटाची निर्मिती केली आहे. मधुसूदन मर्टल यांनी या लघुपटाची कार्यकारी निर्मिती केली असून, कुडाळ येथील माऊली सेवा संस्थेने निर्मितीस सहकार्य केले आहे. नीरज पाटील यांनी या लघुपटाचे छायाचित्रण केले असून राकेश केशवन या मल्याळम सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध युवा संगीतकाराने संगीत दिले आहे. तर भावेश फुलारी यांनी ध्वनी संयोजन केले आहे. 

लघुपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन किशोर अर्जुन यांचे आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा सलग तिसरा, तर लेखक म्हणून सलग सातवा चित्रपट इफ्फिमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यांच्या यापूर्वीच्या चित्रपटांची इफ्फिसह देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झाली असून, काही सिनेकृतींना महत्वाचे पुरस्कार देखील लाभले आहेत.

या लघुपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील नातू आणि आजोबांची भूमिका साकारणारे शिवांश आणि जयप्रकाश सावंत हे खऱ्या आयुष्यातही नातू आणि आजोबा आहेत. त्यामुळे पडद्यावर साकारलेल्या या नात्याला वास्तवाचा भावनिक स्पर्श लाभला आहे. श्री जयप्रकाश सावंत सावंत हे नाट्यअभिनेते व नाट्य दिग्दर्शक असून त्यांनी अनेक सामाजिक नाटकांचे दिग्दर्शन केलेले आहे व  भूमिकाही साकार केलेल्या आहेत.

 सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेच्या कार्यकारणी सदस्यपदी ते काम करतात. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्यासह जानकी नाईक, विकास कासलीवाल आणि मधुसूदन मर्टल यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.

मुख्य कलाकारांसह इतर सहकलाकारांनीही या लघुपटातून पहिल्यांदाच अभिनय केला आहे. या सर्वांना आता इफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळणार आहे. “समाजातील महत्त्वाच्या विषयांवर चित्रपटांच्या माध्यमातून भाष्य व्हावे आणि अशा कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने ‘दर्या’ची निर्मिती करण्यात आली. सेरेब्रल पाल्सी झालेल्या मुलाच्या आयुष्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याचा प्रयत्न या लघुपटातून केला आहे. यानिमित्ताने सिंधुदुर्गातील स्थानिक कलाकारांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली.

विशेष म्हणजे, बहुतांश कलाकार पहिल्यांदाच अभिनय करत आहेत. त्यांच्या कामाला इफ्फीसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात स्थान मिळणे ही आनंदाची बाब आहे. या लघुपटाच्या निर्मितीशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे हे यश आहे,” असे या लघुपटातील प्रमुख कलाकार जयप्रकाश सावंत यांनी सांगितले. स्थानिक कलाकार, स्थानिक परिसर आणि सामाजिक आशय यांचा संगम असलेल्या ‘दर्या’ची इफ्फीच्या ‘द गोवन डिरेक्टर कट’ विभागासाठी झालेली निवड सिंधुदुर्गच्या चित्रपट क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरली आहे.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Veteran Dashavatar performer Mahadev Jiji Chodankar, remembered for his iconic villain and Jambuvant roles.
दशावताराचा खरा 'डॉन' काळाच्या पडद्याआड
November 18, 2026
Dashavatar artist Dr Gaurav Shirke receiving the Konkan Kala Ratna Award at the Thane Malvani Festival.
Konkan Kalaratna Award : मुंबईतील मालवणी महोत्‍सवात गौरव' शिर्के यांना ‘कोकण कलारत्‍न ’पुरस्‍कार प्रदान
November 18, 2026
दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांचा रंगणार सुरेल कार्यक्रम
November 18, 2026
Movies releasing on 20 November 2026 featuring Dhanush, Amit Sadh, Keerthy Suresh and other Bollywood and South Indian stars.
२० नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा धमाका! 'हे' ६ चित्रपट होणार रिलिज, पाहा यादी
November 17, 2026