LIVE UPDATES

दशावताराचा खरा 'डॉन' काळाच्या पडद्याआड

आपल्‍याला हे माहित आहे का?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 07:06 PM
views 1312  views
Veteran Dashavatar performer Mahadev Jiji Chodankar, remembered for his iconic villain and Jambuvant roles.

सावंतवाडी : ज्यांच्या भारदस्त आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने कोकणातील दशावतारी रंगमंच थरथरायचा आणि खलनायकाच्या भूमिकेतही प्रेक्षकांच्या डोळ्यांतून कौतुकाचे पाणी आणायचे, अशा एका दिग्गज कलाकाराची ही गोष्ट आहे. कोकणातील मालवण देवबाग येथील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध दशावतारी कलाकार महादेव सहदेव उर्फ जीजी चोडणकर यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांची कला आजही रसिकांच्या मनात कायम आहे. 

पाच ते सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी कोकणाच्या या पारंपरिक लोककलेची सेवा केली. कोणत्याही लेखी संहितेशिवाय, केवळ अंगात भिनलेल्या कलेच्या बळावर उत्स्फूर्त संवादफेक, नृत्य आणि गायनाचा अनोखा संगम त्यांनी घडवला. कै. बाबी कलिंगण यांच्या 'कलेश्वर दशावतार' मंडळासोबत त्यांनी काम केले.

मुख्यत्वे 'खलनायक' आणि 'राक्षसाच्या' भूमिकांसाठी ते ओळखले जात असले, तरी त्यांची ‘जांबुवंत’ ही भूमिका प्रचंड गाजली. याशिवाय ' आर्य चाणक्य’ यांसारख्या गंभीर भूमिकाही त्यांनी लीलया पेलल्या. त्यांच्या भारदस्त आवाजाने संपूर्ण नाट्यगृह दुमदुमून जायचे. दशावतार लोककलेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या या अमूल्य योगदानाची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

झी गौरव पुरस्कार, माझा लोकराजा महोत्सव सन्मान, आणि राज्यस्तरीय सिंधुरत्न पुरस्कार (२०२०) नवोदित कलाकारांसाठी ते केवळ मार्गदर्शक नव्हे, तर दशावतार परंपरेचे एक 'चालतेबोलते विद्यापीठ' होते. कोकणाच्या या महान भूमिपुत्राला आमची भावपूर्ण श्रद्धांजली.

संकलन - स्वप्निल परब

मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

DARYAA short film directed by Kishor Arjun, selected for the 57th International Film Festival of India 2026.
DARYAA Short Film IFFI 2026 : कोकणचा ‘दर्या’ झळकणार इफ्फीच्या मंचावर
November 19, 2026
Dashavatar artist Dr Gaurav Shirke receiving the Konkan Kala Ratna Award at the Thane Malvani Festival.
Konkan Kalaratna Award : मुंबईतील मालवणी महोत्‍सवात गौरव' शिर्के यांना ‘कोकण कलारत्‍न ’पुरस्‍कार प्रदान
November 18, 2026
दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांचा रंगणार सुरेल कार्यक्रम
November 18, 2026
Movies releasing on 20 November 2026 featuring Dhanush, Amit Sadh, Keerthy Suresh and other Bollywood and South Indian stars.
२० नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा धमाका! 'हे' ६ चित्रपट होणार रिलिज, पाहा यादी
November 17, 2026